Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Anushka Sharma: तर, अनुष्का शर्मा रणछोडदास चांचडची गर्लफ्रेंड झाली असती, ऑडिशनचा तो व्हायरल व्हिडीओ पाहाच

अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस त्यानिमीत्य पाहुया तिच्या करिअरमधला एक महत्त्वाचा किस्सा.

Rahul sadolikar

Happy Birthday Anushka Sharma: रब ने बना दी जोडीच्या जबरदस्त यशानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग चित्रपट देत तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

अनुष्का आज 35 वर्षांची झाली आहे. आज तिच्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

ही गोष्ट खूप लोकांना माहित नाही की, अनुष्काने करीना कपूरने साकारलेल्या 3 इडियट्सच्या पात्रासाठी ऑडिशन दिली होती. चला पाहुया हा व्हायरल व्हिडीओ.

पीकेच्या शूटिंगदरम्यान अनुष्का शर्माने दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमिर खान यांना तिची ऑडिशन टेप दाखवली.

3 इडियट्समध्ये आर माधवन आणि शर्मन जोशी देखील होते आणि करीना कपूर लीड अॅक्ट्रेस म्हणून दिसली. 

अनुष्काने व्हायरल व्हिडीओमध्ये बोलताना ती त्यांना एक मोठं गुपित सांगायला तयार असल्याचं सांगितलं आहे आणि मग ऑडिशनचा तो व्हिडिओ दाखवला.

त्यानंतर तिने सांगितले की 2007 मध्ये तिने एका मोठ्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते.

“3 इडियट्ससाठी अनुष्काने ऑडिशन दिली होती. ती व्हिडीओत म्हणाली की चला आता आमिर आणि राजु हिराणींच्या प्रतिक्रिया बघुया. अनुष्काने थ्री इ़डियट्ससाठी ऑडिशन दिली होती ही गोष्ट आमिर आणि राजू हिराणी दोघांनाही माहित नव्हती. जेव्हा अनुष्काने हा ऑडिशनचा व्हिडिओ दोघांना सेटवर दाखवला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

अनुष्काने या ऑडिशनमध्ये मुन्ना भाई एमबीबीएसच्या क्लायमॅक्समधील ग्रेसी सिंगचा डायलॉग सादर केला होता, हा तो डायलॉग आहे जेव्हा ग्रेसीने बोमन इराणींशी संवाद केला होता ज्यात बोमन इराणी मेडिकल कॉलेजमध्ये संजय दत्तला बदनाम करतात .

आमिर आणि राजकुमार यांनी अविश्वासाने व्हिडिओ पाहिल्याने अनुष्काने लाजत चेहरा लपवला. ग्लिसरीनशिवाय सीनमध्ये तो इमोशनल अभिनय केल्यानंतर आमिरने तिचे कौतुक केले होते. 

तिने एवढी मोठी परीक्षा देऊनही तिला नाकारल्याबद्दल आमिरने राजू हिराणींची खिल्ली उडवली. ते तिघेही योगायोगावर हसत होते, कारण त्यांच्या टीमला त्यांच्या प्रतिक्रिया शूट करण्यास सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT