Anushka Sharma and Virat Kohli Dainik Gomantak
मनोरंजन

Anushaka sharma-Virat kolhi: अनुष्का-विराटने दिली मुलगा झाल्याची गोड बातमी; चाहते म्हणाले मग याआधी...

Anushaka sharma-Virat kolhi: आता अखेर अनुष्काने एक गुड न्यूज देत चाहत्यांचे प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Anushaka sharma-Virat kolhi: विराट आणि अनुष्का हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. क्रिकेटच्या जगात विराटचे आणि मनोरंजनसृष्टीत अनुष्का शर्मांचे लाखो-करोडो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून विराट कसोटी क्रकेटमधून बाहेर होता त्यामुळे त्यामागचे कारण काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता अखेर अनुष्काने एक गुड न्यूज देत चाहत्यांचे प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

अनुष्का शर्माने 20 फेब्रुवारीला सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते- 'खूप आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंत:करणाने, आम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या मुलाचे अकायचे आणि वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत केले आहे. '

तुमचे आशिर्वाद आणि प्रार्थना आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आमच्या वैयक्तिक आयुष्याचे तुम्ही आदर ठेवावा ही विनंती आहे.' अशा आशयाची तिने पोस्ट लिहली आहे.

अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर अनुष्का आणि विराटवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आलिया भट्टने अनुष्काच्या पोस्टवर लिहिले, 'किती सुंदर, अभिनंदन.' मौनी रॉय, रकुल प्रीत सिंग, रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, श्वेता बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, युझवेंद्र चहल, हरभजन सिंग, काजल अग्रवाल, कपिल शर्मा, दिया मिर्झा, सोनम कपूर, विक्रांत मेस्सी यांनीही अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे.

काही चाहत्यांनी मात्र जेव्हा लोक याआधी विचारत होते तेव्हा का लपवले? तुम्हाला तुमचे आयुष्य इतके प्रायव्हेट ठेवायचे आहे तर आत्ताच कशाला सांगितले मुलगा २५ वर्षाचा झाल्यानंतर सांगायचे होते अशाप्रकारच्या कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 2017 मध्ये अनुष्का आणि विराटचे लग्न झाले होते. लग्नाच्या पाच वर्षानंतर अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. आता 15 फेब्रुवारीला पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी ती पुन्हा आई झाली आहे. अनुष्का प्रेग्नंट आहे आणि विराट दुस-यांदा वडील होणार असल्याची अनेक महिन्यांपासून चर्चा होती, पण दोघांनीही सोशल मीडियावर यासंबंधी कोणतीही पोस्ट शेअर केली नसल्यामुळे चाहते संभ्रमात होते. आता मात्र अनुष्का आणि विराटवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT