Anupam Kher Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Anupam Kher Upcoming Movie : रविंद्रनाथ टागोरांच्या भूमीकेत दिसणार हा अभिनेता... फोटोवरुन ओळखलं का?

Rahul sadolikar

अभिनेते अनुपम खेर यांनी खुलासा केला आहे की ते त्यांच्या ५३८ व्या चित्रपटात कवी, तत्त्वज्ञ आणि निबंधकार रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारणार आहेत. शुक्रवारी इंस्टाग्रामवर अनुपम खेर यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना ही बातमी जाहीर केली.या भूमीकेतला आपला लूकही शेअर केला

अनुपम खेर यांचा लूक

ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये, अनुपम खेर यांनी रवींद्रनाथ टागोर वापरत असलेल्या पोशाखासारखा पोशाख परिधान केला आहे. त्यांनी पांढरे केस आणि लांब दाढी देखील ठेवली आहे. पार्श्वभूमीत रवींद्रनाथ टागोरांचे प्रसिद्ध गाणे सोखी, भाबोना कहरे बोले या गाणं वाजत आहे. यात अनुपम खेर गंभीर मुद्रेत दिसत आहेत.

पोस्ट शेअर करताना अनुपम खेर म्हणतात

पोस्ट शेअर करताना अनुपम यांनी कॅप्शन दिले की, "माझ्या ५३८व्या प्रोजेक्टमध्ये #गुरुदेव #रवींद्रनाथटागोर यांची भूमिका साकारताना आनंद झाला. योग्य वेळी सगळं सांगू . . हे माझे भाग्य आहे की मला गुरुदेवांना पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मिळाले आहे! लवकरच मी या चित्रपटाबद्दल अधिक माहिती तुमच्यासोबत शेअर करेन."

युजर्सच्या कमेंटस

पोस्टवर प्रतिक्रिया देताना परवीन दाबस यांनी लिहिले, "वाह (टाळ्या वाजवणारे इमोजी). त्याने फर्स्ट लुक टाकल्यानंतर लगेचच एका चाहत्याने लिहिले, "ओएमजी सर, तुम्ही खरंच त्यांच्यासारखे दिसता." दुसर्‍या व्यक्तीने कमेंट केली, "आणि मला खात्री आहे की तुमच्यापेक्षा चांगली कामगिरी कोणीही करू शकत नाही. पुढची पिढी तुमच्या चेहऱ्यावरून टागोर साहेबांची आठवण ठेवेल." एका युजरने अशीही कमेंट केली की, "अरे! देवा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही सर... उत्कृष्ट." एका इंस्टाग्राम युजरने लिहिले, "वाह.. ग्रेट...ऑल द बेस्ट सर."

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशची राष्ट्रगीते लिहिली आणि अनेक गाणी लिहिली, ज्यांना रवींद्र संगीत म्हणून ओळखले जाते . त्यांना गुरुदेव, कबिगुरु आणि बिस्वकाबी यासह अनेक नावांनी ओळखले जाते आणि सामान्यतः 'बंगालचा बार्ड' म्हणून संबोधले जाते.

अनुपम खेर यांचा आगामी चित्रपट

दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या आगामी मेट्रो इन डिनो या चित्रपटात अनुपम चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान , कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 29 मार्च 2024 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT