Actor Live Suicide : 'कपिल शर्मा शो' फेम या कॉमेडियन केला लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस वेळीच पोहोचले अन्..

ज्युनिअर आर्टिस्ट तीर्थानंद यांनी लाईव्ह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
Actor Live Suicide
Actor Live Suicide Dainik Gomantak
Published on
Updated on

कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या एका कॉमेडियनशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये दिसलेल्या कॉमेडियनने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा कॉमेडियन आत्महत्येचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याने फेसबुक लाईव्ह केले होते. मात्र, लगेचच कॉमेडियनच्या एका ऑनलाइन मित्राने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

लाईव्ह आत्महत्या करण्याचा प्रयत्न

द कपिल शर्मा शोमध्ये दिसलेले ज्युनियर आर्टिस्ट तीर्थानंद यांनी फेसबुक लाईव्हदरम्यानच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. 'आज तक'च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, त्याने फेसबुक लाईव्ह करून फिनाईल पिण्यास सुरुवात केली. त्याला हे करताना पाहून त्याच्या काही ऑनलाइन मित्रांनी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि लगेच पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तीर्थानंद असं या ज्युनिअर आर्टिस्टचं नाव आहे.

पोलिसांची सतर्कता

पोलिसांनी तीर्थानंद यांना तातडीने रुग्णालयात नेले. या वृत्तात हवालदार मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे ,या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तिथे घराचा दरवाजा उघडा होता आणि खोलीत एक कुत्राही होता. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा तीर्थानंद बेशुद्ध अवस्थेत होता.

ती महिला वेश्या निघाली

काही महिन्यांपूर्वी भेटलेल्या एका महिलेमुळे तीर्थानंद यांना हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. कॉमेडियनने सांगितले की महिलेला दोन मुली आहेत आणि कॉमेडियन त्यांच्यासोबत राहत होता. 

नंतर त्याला कळले की ती एक स्त्री वेश्या आहे. यानंतर तो महिलेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला ;पण तिने त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल केल्याचेही तीर्थानंद याने सांगितले.

Actor Live Suicide
Javed Akhtar On Kangna: "म्हणून मी तिला रात्री घरी बोलावलं" जावेद अख्तर यांनी कंगनासंदर्भात कोर्टात सांगितलं हे कारण

नाना पाटेकर यांचा डुप्लिकेट

तीर्थानंद यांनी आज तकला सांगितले की, या प्रकरणामुळे ते घरातून पळून जात होता. त्याने फूटपाथवर झोपायला लागले होते. शेवटी कंटाळून त्याने हा मार्ग निवडला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संकटातून पळून जाऊन तीर्थानंदने जीवन संपवण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2021 मध्ये त्यांनी कोरोनामुळे काम न मिळाल्याने आणि गरिबीमुळे विष प्राशन केले होते. लोक त्यांना ज्युनियर नाना पाटेकर म्हणूनही हाक मारतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com