Anupam Kher on Nadav Lapid Dainik Gomantak
मनोरंजन

Anupam Kher on Nadav Lapid: इफ्फीमध्ये 'The Kashmir Files' ला प्रोपगेंडा म्हणणाऱ्याला खेर यांनी फटकारले

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रोपंडा असल्याच्या वक्तव्यावरून अनुपम खेर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) आयोजित करण्यात आलेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) काल मोठ्या जल्लोषात पार पडला. 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे वर्णन प्रोपंडा आणि असभ्य म्हणून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांच्या वक्तव्यावर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया एकामागून एक येऊ लागल्या आहेत. या वक्तव्यावर आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. 

'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) वर टिका केल्यावर बॉलीवूड (Bollywood) अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- "झूठ का कद कितना भी ऊंचा क्यों न हो, सत्य के मुकाबले में हमेशा छोटा ही होता है" यासोबतच त्यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील त्याचे फोटोही शेअर केले आहेत.

  • इस्रायली चित्रपट निर्मात्याने काश्मीर फाइल्सला 'प्रोपगंडा' म्हंटले

इफ्फी महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी फेस्टिव्हल ज्युरी चेअरमन इस्रायली फिल्ममेकर नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्सवर सडकून टीका केली आहे. ती टीका आता दिग्दर्शक, निर्माते आणि काश्मीर फाईल्सच्या प्रेक्षकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळे वाद सुरु झाले आहेत.

लॅपिड म्हणाले होते की, काश्मीर फाईल्स हा एक व्हल्गर चित्रपट आहे. या महोत्सवामध्ये तो कसा आला याचे मला आश्चर्य वाटते. तो एक प्रोपगंडा चित्रपट (Movie) आहे. त्यामुळे मला त्याचे आश्चर्य वाटते. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

  • अभिनेते दर्शन कुमार यांचे वक्तव्य

या विधानानंतरच 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड करू लागला. यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांची एक एक विधाने समोर येत आहेत. इतकंच नाही तर अभिनेता दर्शन कुमारनेही या विधानावर टीका केली आहे की, 'द काश्मीर फाइल्स' हा एक सामान्य काश्मिरी पंडिताची दुर्दशा दाखवणारा चित्रपट आहे हे सत्य नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT