Anupam Kher

 

Dainik Gomantak

मनोरंजन

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कुचराई... अनुपम खेरांनी चन्नी सरकारवर साधला निशाणा

'आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबत कुचराई झाली आहे. ही पंजाब पोलिस आणि सरकारसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये पंजाब राज्याचाही समावेळश आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. याच पाश्वभूीवर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांनी पंजाबमध्ये (Punjab) प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस सरकारला शह देण्यासाठी इतर राजकीय पक्षांनी चांगलीच मोट बांधली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काल पंजाब दौऱ्यावर होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना हा दौरा रद्द करावा लागला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 42 हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करण्यासाठी पंजाबमधील फिरोजपूर येथे जात असतांना त्यांचा ताफा पंजाबमधील शेतकऱ्यांनी अचानक रस्त्यावर येत अडवला. यावरुनच सुरक्षेच्या कारणावरुन पंजाबमधील फिरोजपूरचा दौरा पंतप्रधान मोदींना रद्द करावा लागला. मात्र या दौऱ्यावरुन कॉंग्रेस आणि भाजपच यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. भाजपमधील केंद्रीय मंत्र्यांपासून ते भाजप नेत्यांनी पंजाबमधील चन्नी सरकारसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. यातच आता पंतप्रधानांच्या दौऱ्यावनरुन प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आरोप -प्रत्यारोप सुरु केला आहे.

दरम्यान, अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलयं की, 'आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सुरक्षेबाबत कुचराई झाली आहे. ही पंजाब पोलिस आणि सरकारसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधानांविषयी काही लोकांचा तिरस्कार प्रतित होतो. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारी भित्रेपणाची भावना दिसून येते. परंतु लक्षात ठेवा,' ''देव तारी त्याला कोण मारी''!

तसेच, भारताची स्टार टेनिसपटू सायना नेहवालने (Saina Nehwal) सुध्दा ट्विटच्या माध्यमातून पंजाबमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात घडलेला प्रकार हा चुकीचा असल्याचे सायनाने म्हटलं आहे. पंजाबमध्ये घडलेला प्रकार हा निंदणीय असल्याचेही तिने यावेळी म्हटलं आहे.

पुढे तिने ट्विट मध्ये असंही म्हटलयं की, ज्या देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड होत असेल, तर ते राष्ट्र सुरक्षित असू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. जर देशाचे पंतप्रधानचं सुरक्षित नसतील तर आपण देश सुरक्षित असल्याचा दावाच करु शकत नाही, असा संतप्त सवाल तिने यावेळी उपस्थितीत केला.

शिवाय महाराष्ट्राचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मागणी केली की, 'पंजाबमधील काँग्रेस सरकार भाजपला इतके घाबरले की, ते आता पूर्णपणे अविचारी वृत्तीने वागत आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेस सरकारने देशवासियांची माफी मागितली पाहिजे.'

तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed : मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

SCROLL FOR NEXT