The Kashmir Files-IFFI Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files-IFFI Controversy: अनुपम खेर ज्युरी प्रमुखांवर पुन्हा संतापले, व्हिडिओ शेअर करत म्हणाले

Anupam Kher Video: अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर केलेल्या वादग्रस्त विधानावर पुन्हा प्रतिक्रिया देत व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2022) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.  इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला "प्रोपगेंडा म्हटले आहे. यामुळे अनेक सिनेकरांसह राजकीय नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रीया सोशल मिडियावर केल्या आहेत.

त्यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी तीव्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी आता पुन्हा एकदा ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून इस्रायली चित्रपट निर्मात्याचा निषेध केला आहे.

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये (Video) म्हटले आहे की, “मित्रांनो, काही लोकांना सत्य जसे आहे तसे पाहण्याची आणि दाखवण्याची सवय नसते. त्यांचा आवडता सुगंध, आवडती चव, लेप, सजावट आणि त्यावर त्यांचा आवडता रंग पाहण्याची त्यांना सवय होते. काश्मीरचे सत्य त्यांच्या पचनी पडत नाही. त्याला रंगीबेरंगी आनंदी चष्म्यांसह दिसावे आणि दाखवावे अशी त्यांची इच्छा आहे. 

दरम्यान 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) वर टिका केल्यावर बॉलीवूड (Bollywood) अनुपम खेर यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- "झूठ का कद कितना भी ऊंचा क्यों न हो, सत्य के मुकाबले में हमेशा छोटा ही होता है" यासोबतच त्यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील त्याचे फोटोही शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT