Captain America 4 Dainik Gomantak
मनोरंजन

Captain America 4: मार्वल सिरीजमध्ये कॅप्टनच्या भुमिकेमध्ये दिसणार 'हा' कलाकार

'कॅप्टन अमेरिका 4' चे दिग्दर्शन नायजेरियन-अमेरिकन चित्रपट डायरेक्ट ज्युलियस ओना करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मार्वलचे चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 'कॅप्टन अमेरिका 4' हा चित्रपट तुमच्या भेटीस येणार आहे. 'कॅप्टन अमेरिका'ची भूमिका ख्रिस इव्हान्सने (Chris Evans) साकारली होती . या भुमिकेने ख्रिसला प्रचंड लोकप्रियता दिली आणि त्याला जगभरात प्रसिद्धीही दिली. भारतातील (India) चाहत्यांसाठीही कॅप्टन अमेरिका म्हणजे ख्रिस इव्हान्स. पण, कॅप्टन अमेरिकाच्या चौथ्या भागात ख्रिस इव्हान्स नाही तर दुसरा अभिनेता दिसणार त्यामुळे प्रेक्षक थोडे दु:खी होऊ शकतात. ख्रिस इव्हान्सची जागा घेणारा अभिनेता एवढी ताकद दाखवू शकेल का, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. (Captain America 4 News)

* सॅम विल्सन हा अमेरिकेचा नवा कॅप्टन असेल

सॅम विल्सन हा नवा कॅप्टन अमेरिका असेल. कॅप्टन अमेरिकेच्या सर्व अधिकारांसह, शील्डचा उत्तराधिकारी फाल्कन म्हणजेच सॅम विल्सन (Anthony Mackie) बनवला गेला आहे. फाल्कन म्हणजेच सॅम विल्सन आता नवा कॅप्टन अमेरिका, ज्याचा सोलो लीड म्हणून पहिला चित्रपट आहे. फाल्कन हा कॅप्टन अमेरिकेचा मित्र आहे. 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'मध्ये कॅप्टन अमेरिका त्याच्या टीमसोबत परतल्यावर फाल्कनला त्याची ढाल देताना एक धडाही देतो. कॅप्टन अमेरिकेने फाल्कनला मदत मागितल्यावर तो लगेच तयार झाला. त्यानंतर फाल्कनने अॅव्हेंजर बनण्याचा मार्ग स्वीकारला. फाल्कनची सर्व शक्ती आता 'कॅप्टन अमेरिका 4' (Captain America 4) मध्ये दिसणार आहे.

* ज्युलियस ओना बनवणार 'कॅप्टन अमेरिका 4'

'कॅप्टन अमेरिका 4' हा सॅम विल्सन म्हणजेच अँथनी मॅकीचा पहिला सोलो मुख्य चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत काही महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. 'कॅप्टन अमेरिका 4' चे दिग्दर्शन नायजेरियन-अमेरिकन चित्रपट डायरेक्ट ज्युलियस ओना करणार आहेत. 2015 मध्ये त्यांनी 'द गर्ल इज इन ट्रबल' या थ्रिलर चित्रपटाची (Movie) कथा लिहिली होती.

हे लक्षात घ्यावे की कॅप्टन अमेरिका म्हणजेच स्टीव्ह रॉजरने 2011 मध्ये 'कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट अॅव्हेंजर' म्हणून मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये पदार्पण केले होते. हॉलिवूड (Hollywood) स्टार ख्रिस इव्हान्सने या चित्रपटात सुपरहिरोची भूमिका लिहिली होती. त्यानंतर त्यांनी 'कॅप्टन अमेरिका: द विंटर सोल्जर, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर' तसेच 'द अॅव्हेंजर्स', अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रान आणि अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर आणि अॅव्हेंजर्स: एंडगेम या प्रोजेक्ट्समध्ये काम केले. मात्र, यावेळी ख्रिस इव्हान्स या चित्रपटात दिसणार नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT