Animal Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Animal Movie: जादू सात सेकंदाच्या क्लिपची! बॉबीने असं कायं केलयं ज्याची सगळीकडे होतेयं चर्चा

Animal Movie: अवघ्या 7 सेकंदात बॉबी देओल चांगलाच भाव खाऊन गेला आहे. प्रेक्षकांना बॉबीचा लूक आणि त्याचे हावभाव भलतेच आवडले आहेत.

दैनिक गोमन्तक

Animal Movie: सध्या अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी बहुचर्चित चित्रपटांपैकी एक म्हणजे अॅनिमल हा एक आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरने सर्वांनाच वेड लावले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या रणबीर कपूर स्टारर चित्रपटाच्या टीझरच्या शेवटी बॉबी देओलची झलकही दिसली. अवघ्या 7 सेकंदात बॉबी देओल चांगलाच भाव खाऊन गेला आहे. प्रेक्षकांना बॉबीचा लूक आणि त्याचे हावभाव भलतेच आवडले आहेत.

आता एका मुलाखतीदरम्यान, बॉबी देओल आपल्या व्यक्तीरेखेविषयी खुलासा केला आहे. चित्रपटाच्या टीझरमधील त्याच्या 7 सेकंदांच्या झलकबद्दल बॉबी म्हणतो, 'जेव्हा मी तो दरवाजा उघडण्याचा शॉट केला तेव्हा मी मॉनिटरकडे पाहिलेही नाही. तेव्हा आम्ही घाईत होतो.

काम संपवायचे होते. टीझर आला तेव्हा मीही तो शॉट पहिल्यांदा पाहिला आणि पाहून थक्क झालो, तो मीच आहे का? प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना ही शैली आवडल्याने आपण खूप खूश असल्याचे त्याने म्हटले आहे.

पुढे बोलताना बॉबी म्हणतो की, मला विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारायच्या आहेत. मला एकाच प्रतिमेत पाहणाऱ्या लोकांना मला माझ्या इतर भूमिका पण दाखवायच्या आहेत. मला हा चित्रपट मिळाला याबद्ल मी स्वत:ला नशीबवान समजतो कि मला या चित्रपटाचा भाग बनण्याची मला संधी मिळाली.

संदीपचे काम मला नेहमीच आवडते. तो एकमेव असा डायरेक्टर आहे की ज्याने एकच चित्रपट दोन वेळा बनवला ( अर्जून रेड्डी आणि कबीर सिंग ) आणि हे दोन्ही हे चित्रपट यशस्वी ठरले आहेत.

अनेकजण हे जाणू इच्छितात की मी त्या सीन मध्ये काय करत आहे? मी काहीतरी खात आहे परंतु आत्ता मी तुम्हाला ठामपणे सांगू शकत नाही की मी काय खात आहे. आता त्यानंतर सोशल मिडिया( Social Media )वर कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहेत.

एका युजरने म्हटले आहे की, वांगा जोपर्यंत काहीतरी धक्का देणारं दाखवत नाही तोपर्यंत त्याला चैन पडत नाही. मला तर असे वाटते की तो या चित्रपटात इतर कलाकारांना खाऊन टाकणार आहे. दुसऱ्या एका युजरने असे लिहले आहे की, मला तर असे वाटते की चित्रपटात खरा अॅनिमल हाच आहे आणि तो नरभक्षी आहे.

दरम्यान, बॉबीची चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार आहे? तो त्या व्हायरल शॉटमध्ये काय खाणार आहे हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजू शकते. चित्रपटात( Movie ) रणबीर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अनिल कपूरदेखील या चित्रपटात दिसून येत आहे. चाहते अॅनिमल या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

SCROLL FOR NEXT