Tiger 3 Trailer Out: भाईजानच्या 'टाइगर 3' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; कॅटरिना अन् इमरान हाश्मी...

Tiger 3 Trailer: कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनीही आपल्या जबरदस्त स्टंटने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Tiger 3 Trailer Out
Tiger 3 Trailer OutDainik Gomantak
Published on
Updated on

Tiger 3 Trailer: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आता नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा टाइगर ३ ची चर्चा चांगलीच रंगली होती. आता या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या या चित्रपटाच्या ट्रेलरने धमाका केला आहे. कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनीही आपल्या जबरदस्त स्टंटने सर्वांना चकित केले आहे.

अॅक्शन-थ्रिलर चित्रपट टायगर 3 चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्राने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान, कतरिना आणि इम्रान मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 'एक था टायगर' (2012) आणि 'टायगर जिंदा है' (2017) चा सिक्वेल आहे. YRF spy universe चा हा पाचवा चित्रपट आहे.

या ट्रेलर( Trailer )मध्ये सलमान खान बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, आजपर्यंत मी माझ्या देशाच्या संरक्षणासाठी अनेक संकटे झेलली आहे. गेली २० वर्षे मी निस्वार्थपणे काम करत आहे. याबदल्यात मी काहीच मागितले नाही.

परंतु मला आता या बदल्यात काहीतरी हवे आहे. मला देशाकडून माझे कॅरक्टर सर्टिफिकेट हवे आहे. कारण मला देशासमोर एका शत्रूच्या रुपात उभे केले आहे. असे सलमान( Salman Khan ) म्हणताना दिसत आहे.

Tiger 3 Trailer Out
Kuch kuch Hota Hai: 'कुछ कुछ होता है' ची सिल्व्हर ज्युबिली, स्पेशल स्क्रिनिंगला काजोलची दांडी

आता हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. टाइगर 3 हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होत आहे. आता सलमानच्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com