Animal Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Animal Box Office Collection: ॲनिमल चित्रपटाने सातव्या दिवशीही केली कमाल

Animal Box Office Collection: 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांचा हा तिसरा चित्रपट आहे

दैनिक गोमन्तक

Animal Box Office Collection: सध्या रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट गेल्या 7 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

रणबीर कपूरच्या चित्रपटाने 7 दिवसात देशभरात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. परदेशातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रणबीर कपूर व्यतिरिक्त हा चित्रपट अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचाही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने गुरुवारी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

'अॅनिमल' ने गुरुवारी म्हणजेच सातव्या दिवशी 25.50 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी ६३.८ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि रविवारी सर्वाधिक ७१.४६ कोटींची कमाई केली होती. सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईत किंचित घट झाली आहे. या चित्रपटाने 7 दिवसांत एकूण 338.85 कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 7 दिवसांत 550 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने 6 दिवसात 527.60 कोटींची कमाई केली होती, तर परदेशातही चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने 6 दिवसात परदेशात 154.60 कोटी रुपये कमावले, तर चित्रपटाने 6 दिवसात 373 कोटी रुपयांचे कमाई केली.

'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांचा हा तिसरा चित्रपट आहे आणि त्याने त्या दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर एका अशा मुलाच्या भूमिकेत आहे जो लहानपणापासून वडिलांच्या प्रेमासाठी तळमळत मोठा झाला आहे.

आता जेव्हा तो मोठा होतो तेव्हा तो अजूनही आपल्या वडिलांसाठी तितकाच वेडा असतो आणि या काळात तो भावनिक आणि क्रूर अशा दोन्ही पात्रांमध्ये दिसू लागतो. चित्रपटात अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची तर रश्मिका मंदान्ना त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Goa Assmbly Live: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा; आमदार निलेश काब्राल यांची मागणी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

Mohammed Siraj: मिया भाईची 'मायसेल्फ' स्टोरी...! ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया; 'त्या' आठवणीने झाला भावूक VIDEO

SCROLL FOR NEXT