दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या राम- लखनने एक काळ गाजवला होता.या चित्रपटात रामची भूमीका जॅकी श्रॉफ यांनी तर लखनची भूमीका अनिल कपूर यांनी केली होती. आता हेच राम - लखन पुन्हा एकत्र दिसणार आहे.
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या आगामी चोर-पुलिस चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी बॉलिवूडमधली एक यशस्वी जोडी म्हणुन ओळखली जाते. कारण या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये 'राम लखन', 'कर्मा' आणि 'त्रिमूर्ति' हे प्रमुख चित्रपट सांगता येतील. या हिट जोडीने आतापर्यंत 12 चित्रपटात एकत्र काम केलं आहे
त्यामुळे आता या दोघांच्या एकत्र येण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही वाढणार हे नक्की. चोर- पुलीस चं दिग्दर्शन सुभाष घई करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट अनिस बाजमी आणि पट्टू पारीख यांनी लिहिला आहे. चित्रपटाची कथा विनोदी आहे.या चित्रपटात अनिल कपूर चोरांच्या फॅमिलीतून असतात तर जॅकी श्रॉफ हे पोलिस असतात.
कॉमेडीचा तडका असलेला हा चित्रपट मजेदार असेल हे नक्की. अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत अनिल कपूर आणि काम करताना येत असलेली असुरक्षितता यावर सांगितलं होतं.
ते म्हणतात अनिल कपूर माझे सिनियर असले तरी माझे खुप चांगले मित्र आहेत. एकदा तुम्ही काम करायला सुरूवात केली कि सिनीयर,ज्युनिअर असं काही उरत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.