Sonam Kapoor with Anand Ahuja Dainik Gomantak
मनोरंजन

अनिल कपूर होणार आजोबा? रियाच्या लग्नात सोनमला पाहून चाहत्यांमध्ये चर्चा

अनिल कपूरची (Anil Kapoor) धाकटी मुलगी रिया कपूरने (Rhea Kapoor) तिचा बॉयफ्रेंड करण बलुनीसोबत (Karan Boolani) लग्न केले.

दैनिक गोमन्तक

अनिल कपूरची (Anil Kapoor) धाकटी मुलगी रिया कपूरने (Rhea Kapoor) तिचा बॉयफ्रेंड करण बलुनीसोबत (Karan Boolani) लग्न केले. या दरम्यान, बहीण सोनम कपूर तिचा पती आनंद आहुजासोबत पोहोचली. सोशल मीडियावर फोटो पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या, सोनम कपूर गर्भवती आहे का?

सोनम कपूर गर्भवती आहे का?

बहीण रियाच्या लग्नात सोनम कपूरने (Sonam Kapoor) तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पेस्टल ग्रीन कलरची अनारकली परिधान केलेली सोनम खूपच क्यूट दिसत होती. सर्वांच्या नजरा सोनमवर खिळल्या होत्या. हे फोटो पाहून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. पण त्याचवेळी त्यांनी शंका व्यक्त केली की सोनम कपूर गर्भवती आहे की नाही?

बरं, ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही जेव्हा सोनम लंडनहून भारतात परतली होती, तेव्हा पापा अनिल कपूर स्वतः तिला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. यादरम्यान सोनम इतकी भावूक झाली की तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. सोनमने विमानतळावर खूप सैल कपडे घातले होते, हे पाहून सोनम कपूरच्या गर्भधारणेच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, आता अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पित होती आले चहा

काही दिवसांपूर्वी सोनमने एक व्हिडिओ शेअर करून तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीला पूर्णविराम दिला होता. व्हिडिओ शेअर करताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि आले चहा.' या व्हिडिओद्वारे सोनमने आता ती गर्भवती नसल्याच्या सर्व अफवा फेटाळल्या आहेत.

उशिरा संध्याकाळपासून, निवडक मित्र आणि नातेवाईक रिया-करणच्या लग्नासाठी येऊ लागले. अर्जुन कपूर, बोनी कपूर, मसाबा गुप्ता, अंशुला कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, संदीप मारवाह, संजय कपूर, महेप कपूर आणि जहान कपूर यांच्यासह रिया-करणच्या लग्नात सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

SCROLL FOR NEXT