Anil Kapoor is getting his treatment in Germany  Dainik Gomantak
मनोरंजन

अनिल कपूर झुंजतायत गंभीर आजाराशी? जर्मनीत सुरू आहेत उपचार

चित्रपट अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हा सध्या जर्मनीत आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

चित्रपट अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हा सध्या जर्मनीत आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनिल कपूरला फिटनेस तज्ञ मानले जाते. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या उपचाराविषयी सांगितले आहे. त्यामध्ये तो जर्मन सेलिब्रिटी डॉक्टर डॉ.मुलर यांची भेट घेत आहे. अनिल कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने खुलासा केला आहे की, शुक्रवारी त्याचा उपचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तो जर्मनीमध्ये डॉक्टरांना भेटायला जाणार आहे.

व्हिडिओमध्ये अनिल कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्याशिवाय त्याने टोपी आणि काळी पँट घातली आहे. व्हिडिओ शेअर करताना अनिल कपूरने लिहिले की, 'बर्फात खूप छान चाललो. माझ्या उपचाराच्या शेवटच्या दिवशी जर्मनीत डॉ. मुलर यांना भेटायला गेलो. त्यांच्या जादुई स्पर्शाबद्दल कृतज्ञ.' अनिल कपूर जर्मनीच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अनिल कपूरने रॉकस्टार चित्रपटाचे गाणे टाकले आहे. अनिल कपूर लवकरच जुग जुग जियो या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात नीतू कपूरची महत्त्वाची भूमिका आहे. अनिल कपूरला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अनिल कपूरच्या मुलींचे नाव सोनम कपूर आहे. आणि रिया कपूर आहे. मुलाचे नाव हर्षवर्धन कपूर आहे. चाहत्यांनी अनिल कपूरच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तो कोणत्या आजारावर उपचार घेत आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

अनिल कपूर हा चित्रपट अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चित्रपटांना खूप पसंती दिली गेली आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.तो अनेकदा त्याच्याशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे त्याचे चाहते देखील खूप उत्साहित असतात. अनिल कपूरचे चित्रपट खूप आवडतात. त्याने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT