Rani Mukerji  Dainik Gomantak
मनोरंजन

Rani Mukerji: ...अन् अशी सापडली राणी; सांगितली आपल्या जन्माची गोष्ट

Rani Mukerji: राणीच्या आईने आपल्या बाळाचे डोळे तपकिरी असून तिचा शोध घेण्यास सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Rani Mukerji: राणी मुखर्जी ही वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारी गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज राणीचा वाढदिवस आहे. राणी मुखर्जीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल खास गोष्टी जाणून घेऊयात .

राणीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की जन्मताच तिची अदलाबदली झाली होती. दवाखान्याचे व्यवस्थापन नीट नसल्यामुळे ती एका पंजाबी कुटुंबाकडे पोहोचली होती. मात्र तिच्या आईला आपल्या बाजूला असलेले बाळ आपले नसल्याची खात्री होती.

राणीच्या आईने आपल्या बाळाचे डोळे तपकिरी असून तिचा शोध घेण्यास सांगितले. आणि नंतर राणी पंजाबी कुटुंबाजवळ सापडली असे तिने सांगितले होते.

राणी ही फिल्ममेकर राम मुखर्जी यांची मुलगी आहे आणि तिचे लग्न यश चोप्रा यांचा मुलगा दिग्दर्शक आदित्य चोप्राशी झाले आहे.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने तिने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज राणी मुखर्जी 21 मार्च रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दरम्यान,अभिनय क्षेत्रात आपल्या उंची आणि रंगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं सांगितले आहे. राणी मुखर्जीचा नॉर्वे व्हर्सेस मिसेस चटर्जी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

SCROLL FOR NEXT