Arrest Warrent against actress jaya prada : 70 आणि 80 च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री जया प्रदा यांच्याविरोधात अटक वॉरंट निघालं असुन त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे? लोकसभा निवडणूकीच्या वेळेस माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती.
या प्रकरणाचे सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद उमटले होते. या प्रकरणावर जयाप्रदा यांना कोर्टात जावून त्यांचा जवाब द्यायचा आहे. त्याप्रकरणी त्यांना समन्सही पाठविण्यात आले असून मात्र त्या कोर्टात गेल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणात कोर्टानं समन्स पाठवूनही अभिनेत्री जयाप्रदा कोर्टात न गेल्यानं आता कोर्टानं कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होणा आहे. २०१९ मध्ये जयाप्रदा यांच्यावर स्वार पोलीस ठाण्यामध्ये आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
जया प्रदा यांच्याविरोधातील हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. यात माजी खासदार जयाप्रदा यांची बाजू नोंदवणे बाकी आहे. मात्र त्यांना सातत्यानं कोर्टात हजर राहण्याविषयी समन्स पाठवूनही त्या गैरहजर राहिल्या त्यामुळे आता कोर्टानं आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जयाप्रदा यांचे ते प्रकरण चर्चेत आले आहे. या सगळ्यात आता कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट काढल्यानं वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. दुसरीकडे जयाप्रदा यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.