Alimony  Dainik Gomantak
मनोरंजन

अमृता सिंगने पोडगी मागितली तर सैफ अली खानने...

लग्नाच्या काही वर्षांनी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि 13 वर्षांच्या लग्नानंतर 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने तिच्या करिअरच्या शिखरावर पोहोचून 1991 मध्ये पतौडी घराण्याचे नवाब सैफ अली खानसोबत लग्न केले. हे लग्न खूप गाजले होते, त्यामागे दोन खास कारणे होती.

पहिली गोष्ट म्हणजे अमृता सिंग तेव्हा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर सैफने तेव्हा चित्रपटात पदार्पणही केले नव्हते. दुसरीकडे, सैफ अली खान (Saif Ali Khan) वयाने अभिनेत्री अमृता सिंगपेक्षा (Amrita Singh) खूपच लहान होता.

लग्नाच्या वेळी सैफ अली खान 21 वर्षांचा होता, तर अमृता सिंग 33 वर्षांची होती. या जोडप्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि 13 वर्षांच्या लग्नानंतर 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

मात्र, प्रकरण एवढ्यावरच संपले नाही. बातम्यांनुसार, घटस्फोटानंतर अमृता सिंहने सैफ अली खानकडे मोठी पोटगी मागितली होती. अमृताने सैफकडे पोटगी (Alimony) म्हणून 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचे बोलले जात आहे.

एवढेच नाही तर मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत सैफ अली खानला दरमहा 1 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी अमृताने केली होती. अमृताची ही मागणी ऐकून पतौडी नवाब सैफही भडकला होता.

सैफने एका मुलाखतीत पोटगीशी संबंधित प्रश्नावर सांगितले होते, 'माझ्याकडे इतके पैसे नाहीत, मी शाहरुख खान (Shah Rukh Khan) नाही पण तरीही मी तिला वचन दिले आहे की, मला त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी मी हे सर्व त्याला देईन.

घटस्फोटानंतर अमृताने आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान यांच्यासोबत आपला वेगळा संसार थाटला.

दुसरीकडे, सैफ अली खानला करीना कपूरमध्ये (Kareena Kapoor) त्याचे प्रेम सापडले आणि त्याने 2012 मध्ये तिच्याशी लग्न केले. सैफला करिनापासून दोन मुलगे असून त्यांची नावे तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT