KBC Amitabh Bacchan  Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: 'केबीसी'च्या सेटवर बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली गेली

स्टाफ, डॉक्टरांच्या पथकाने रोखला रक्तप्रवाह; ट्रेडमिल न वापरण्याचा सल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Amitabh Bachchan: बॉलीवुडचे महानायाक अमिताभ बच्चन सध्या टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोचे सुत्रसंचालन करत आहेत. नुकतेच त्यांनी स्वतःच्या ब्लॉगमधून एक माहिती दिली आहे. त्यानुसार कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला असून यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि टाकेही घालावे लागले होते.

या अपघातात बच्चन यांच्या पायाची नस कापली गेली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल केले गेले. रक्तप्रवाह रोखण्यासाठी त्या जखमेवर टाकेही घातले गेले. बच्चन यांनी प्रकृती सध्या ठीक असल्याचे त्यांनी ब्लॉगमधून चाहत्यांना सांगितले आहे. डॉक्टरांनी सध्या बच्चन यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

बिग बी यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, धातुच्या एका तुकड्याने डाव्या पायाची नस कापली गेली. नस कापली गेल्यावर रक्तप्रवाहावर नियंत्रण राहत नाही. पण स्टाफ आणि डॉक्टरांच्या पथकाने वेळेवर मदत केल्याने रक्तप्रवाहावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या जखमेवर आता टाकेही घातले गेले आहेत.

डॉक्टरांनी बच्चन यांना आता या पायावर जास्त जोर न देण्यास सांगितले आहे, पायाची हालचालही कमी करण्यास सांगितले आहे. तसेच ट्रेडमिलवर चालण्यास मज्जाव केला आहे.

अमिताभ बच्चन हे अनेक वर्षांपासून केबीसीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या सुत्रसंचलनामुळे या शोची लोकप्रियता आजही चांगली टिकून आहे. नुकतेच 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिनानिमित्त या शोमध्ये विशेष कार्यक्रम झाला होता. त्यात अभिषेक बच्चन आणि जया बच्चन देखील सहभागी झाले होते. यावेळी अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची एक कविता ऐकवली गेली होती, ती ऐकून अमिताभ बच्चन यांना गहिवरून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

SCROLL FOR NEXT