Amitabh Bachchan KBC Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन यांनी सांगितला वडिलांच्या आंतरधर्मीय विवाहाची आठवण, म्हणाले त्यांना खूपच...

Rahul sadolikar

Amitabh Bachchan : तु न रुकेगा कभी तु न थकेगा कभी कर शपथ, कर शपथ, कर शपथ ...अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. कवितेच्या या प्रेरणादायी ओळी आहेत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या. हिंदीतले हे महान कवी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडिल.

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर बिग बींनी नुकताच वडील हरिवंशराय बच्चन यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. चला पाहुया कौन बनेगा करोडपती शोच्या सेटवर बिग बींनी सांगितलेला किस्सा.

अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती

बॉलीवूड अभिनेता गेल्या 14 वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत आहे. यंदाही तो वेगळ्या अंदाजात दिसत आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये बिग बींनी त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाची कथा सांगितली आणि त्यांच्या आंतरजातीय विवाहानंतर लोक हरिवंशराय बच्चन यांच्या विरोधात कसे गेले.

कौन बनेगा करोडपतीच्या नुकत्याच शूट झालेल्या एका एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा प्रश्न विचारला आणि योजना यादव या स्पर्धकाने हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवली. योजना सीटवर आल्या आणि मग नेहमीप्रमाणे बिग बींनी त्यांच्या आकर्षक आणि मोहक आवाजात संवाद सुरू केला.  

बिग बी म्हणाले

सुरूवातीला योजना यादव यांनी 10 हजार रुपयांची रक्कम जिंकली. यानंतर, त्यांचा एक छोटा व्हिडिओ देखील प्ले केला गेला,

त्यानंतर स्पर्धक योजना यादव 80 हजारांच्या प्रश्नापर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर 3 लाख 20 हजारांचा टप्पाही पार करतात. प्रश्नोत्तरांच्या दरम्यान बिग बींनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या आंतरजातीय विवाहाचाही उल्लेख केला.

Amitabh Bachchan KBC

आंतरजातीय विवाहाचा किस्सा

कौन बनेगा करोडपती 15 मध्येच विचारलेल्या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नाचा उल्लेख केला. किस्सा सांगताना बिग बी म्हणाले की सरोजिनी नायडू त्यांच्या 'बाबूजी'च्या खूप मोठ्या चाहत्या होत्या.

 'सरोजिनी नायडू माझ्या बाबूजींची खूप मोठी फॅन होती हे सांगायला मला जरा संकोच वाटतो. माझ्या बाबूजींनी आंतरजातीय विवाह केला होता. माझी आई तेजी शीख कुटुंबातील होती आणि जेव्हा आम्ही अलाहाबादमध्ये राहत होतो, हा तो काळ होता जेव्हा दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी लग्न करणे हा शाप मानला जात होता.

वडील आईला घेऊन अलाहाबादला आले

अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, 'त्यावेळी लोक माझ्या वडिलांच्या विरोधात गेले, जेव्हा त्यांनी आईला अलाहाबादला आणले. त्यामुळे त्यांचे सांत्वन करणाऱ्या सरोजिनी नायडू या पहिल्या व्यक्ती होत्या. 

त्यांनी त्यांची ओळख पंडित जवाहरलाल नेहरूंशी करून दिली, जे त्यावेळी अलाहाबाद येथील आनंद भवनात राहत होते. त्यांनी माझ्या वडिलांची ओळख कशी करून दिली ते मला अजूनही आठवते. ते म्हणाले होते, 'कवी आणि त्यांच्या कवितेला भेटा.'

6 लाख 40 हजारांचा प्रश्न

खेळ पुढे नेत अमिताभ बच्चन यांनी योजना यादव यांना 6 लाख 40 हजारांसाठी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी लाइफलाइनचा वापर केला. त्यानंतर त्यांना 12 लाख 50 हजार रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला. 

त्यासाठी त्याने त्याच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉलही केला. तिच्या मैत्रिणीने दिलेले उत्तर चुकीचे निघाले आणि असे केल्याने तिने जिंकलेली रक्कम गमावली आणि ती 3 लाख 20 हजारांवर त्यांना समाधान मानावे लागले.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT