Amitabh Bachchan - Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

बिग बी आणि किंग खान दिसणार एकत्र...17 वर्षांची दोन्ही डॉन येणार एकत्र

बॉलीवूडचा शेहनशाह आणि बादशाह आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत

Rahul sadolikar

Amitabh Bachchan and Shahrukh Khan will Work together : बॉलीवूडचे दोन्ही डॉन अर्थात बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्या यांच्या स्टारडमची तुलना कोणत्याच दुसऱ्या स्टारशी होऊ शकत नाही. मोहब्बते, कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांमधुन दोन्ही स्टार्सनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांंचं मनोरंजन केलं.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानला एकत्र पाहणं हे दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण गेल्या काही वर्षात दोघांना एका चित्रपटात आणणे दिग्दर्शकांना शक्य झाले नाही ;पण आता एका आगामी चित्रपटात दोन्ही स्टार्स एकत्र दिसणार आहेत.

अमिताभ आणि शाहरुख...

बॉलीवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान . दोन सुपरस्टार्स बॉलीवूडवर राज्य करतात आणि प्रदीर्घ काळापासून, संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी वाट पाहत आहे. 

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. बिग बी आणि शाहरुख शेवटचे 2006 मध्ये करण जोहर दिग्दर्शित 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा यांच्याही भूमिका होत्या.

दोघांचे एकत्र चित्रपट

मिळालेल्या माहितीनुसार, एका आगामी प्रोजेक्टमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या प्रोजेक्टबद्दल अद्याप फारशी माहिती नसली तरी, लवकरच यासंदर्भातल्या अपडेट्स समोर येतील. 

मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांनी यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

डॉनमध्ये कॅमिओ करणार का?

बिग बी आणि शाहरुख पुन्हा एकत्र येण्याची बातमी समोर येताच, चाहत्यांनी ते डॉन 3 मध्ये कॅमिओ करणार की नाही असे अंदाज बांधले आहेत. डॉन 3 ची घोषणा काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक फरहान अख्तरने केली होती.

नव्या भूमीकेत रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारणार आहे . डॉन फ्रँचायझी यापूर्वी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान करत होते

चाहत्यांच्या कमेंटस

एका चाहत्याने कमेंट केली, "डॉन 3 मध्ये कॅमिओ आहे काय?" आणखी एकाने विचारले की, कभी खुशी कभी गम 2 नव्याने येणार आहे?. आणखी एक कमेंट एका चाहत्याने केली, "त्यांना पुन्हा एका चांगल्या चित्रपटात पाहायला आवडेल." “शहेनशा × बादशाह,” अशीही कमेंट एका चाहत्याने केली.

अमिताभ बच्चन पुढे कल्की 2898, द उमेश क्रॉनिकल्स आणि गनपाथ'मध्ये दिसणार आहेत. दरम्यान, शाहरुख खान जवानच्या रिलीजच्या तयारीला लागला आहे. त्याची डंकीही पाइपलाइनमध्ये आहे.

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

SCROLL FOR NEXT