Shah Rukh Khan, Amitabh Bachchan | Kolkata International Film Festival Dainik Gomantak
मनोरंजन

Kolkata International Film Festival : कोलकाता चित्रपट महोत्सवात बिग बी अमिताभ आणि किंग खान शाहरुखचा होणार सन्मान

कोलकाता चित्रपट महोत्सवात बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा सन्मान केला जाणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Kolkata Film Festival: बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) बॉलीवूडचे दिग्गज आणि नावाजलेले कलाकार. दोघांनीही वेगवेगळ्या कलाकृतींमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'मोहब्बते' आणि 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी दोघेही सतत चर्चेत असतात.

सध्या ही दोन नावं चर्चेत येण्याचं कारण कोलकाता फिल्म फेस्टिव्हल हे आहे. काेलकाता इथं होणाऱ्या २८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता शाहरुख खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा सन्मान होणार आहे.

सध्या सर्वत्र चित्रपट महोत्सवांची क्रेझ सुरु आहे. बॉलीवूडचे बरेच सेलीब्रिटी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.

कोलकाता इथं होणाऱ्या या फेस्टिव्हल ला बिग बी आणि जया बच्चन सहभागी होणार आहेत. जया बच्चन(Jaya Bachchan) यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. बंगालशी बच्चन कुटुंबियांचे एक अनोखे नाते आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 'कौन बनेगा करोडपती'च्या स्पेशल एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी बच्चन कुटुंबिय आणि बंगालच्या नात्याविषयी सांगितलं होतं.

कोलकत्यात संपन्न होणारा हा फेस्टिव्हल 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत असणार आहे. या फेस्टिव्हल मध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा 'गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणुन सन्मान केला जाणार आहे.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांंच्याशिवाय या महोत्सवात अभिनेत्री राणी मुखर्जी, दिग्दर्शक महेश भट्ट, गायक कुमार सानू आणि शत्रुघ्न सिन्हा हे दिग्गजही सहभागी होणार आहेत.

‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२२’ या अलिकडेच सौदी अरेबिया इथं पार पडलेल्या महोत्सवात शाहरुख खानला विशेष निमंत्रण होतं. या महोत्सवात शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंगही आयोजित करण्यात आलं होतं. सध्या शाहरुखचा पठाण हा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे भविष्य काय आहे हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

SCROLL FOR NEXT