Abhishek Bachchan Instagram
मनोरंजन

Cannes वरुण परतताच अभिषेक बच्चन 'या' कारणामुळे झाला भावुक

Abhishek Bachchan Suit stylist Died: अभिषेक बच्चने सोशल मिडियायवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच त्याची पत्नी आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 ला उपस्थित राहून भारतात परतला आहे. घरी येताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण घरी परतताच अभिषेकला एक वाईट बातमी मिळाली, ज्यामुळे तो खूप भावुक झाला. त्याने सोशल मिडियायवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Abhishek Bachchan Suit stylist Died News)

अभिषेकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, त्याचे कुटुंब आणि अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळचे कॉस्च्युम डिझायनर अकबर शाहपूरवाला यांचे निधन झाले आहे. आपल्या पोस्टमध्ये, असेही म्हटले आहे की अकबरने बिग बींसाठी अनेक सूट आणि ड्रेस शिवले आहेत. त्यांनी अभिषेकसाठी पहिला सूटही तयार केला होता.

अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी खूप दुःखद बातमी घेऊन घरी परतलो आहे. चित्रपट जगतातील खरे दिग्गज अकबर शाहपूरवाला यांचे निधन झाले. मी त्याला अक्की अंकल या नावाने ओळखत होतो.

माझ्या आठवणीनुसार, माझ्या वडिलांचे बहुतेक ड्रेस आणि सूट त्यांनी बनवले होते, त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांसाठी (Movie) सूट देखील बनवले होते. त्यांनी लहान मुलासारखा माझा पहिला सूट बनवला जो माझ्याकडे अजूनही आहे.

रिफ्युजीच्या प्रीमियरमध्ये मी तो सूट घातला होता. ते मला नेहमी म्हणत असे की 'सूट कापणे म्हणजे फक्त शिवणे नाही तर ती एक भावना आहे. जेव्हा तुम्ही माझा सूट घालता तेव्हा त्याची प्रत्येक शिलाई मोठ्या प्रेमाने केली जाते. ज्यामध्ये आशीर्वाद आहे'. 'माझ्यासाठी ते जगातील सर्वोत्तम सूट बनवणार होते. अक्की अंकल, तुम्ही माझ्यासाठी जे सूट बनवले आहेत, त्यापैकी एक मी आज रात्री घालेन आणि धन्य वाटेल! तुमच्या आत्म्याला शांती लाभो'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT