Ameesha Patel  Dainik Gomantak
मनोरंजन

Ameesha Patel: 'फक्त तेच कलाकार ब्रेक घेतात' अमिषा पटेलचे मोठे वक्तव्य

Ameesha Patel: ४७ वर्ष असून तिला अनेकदा तिच्या वयावरुन ट्रोल केले जाते. त्यावर तिने उत्तर दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Ameesha Patel: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने ५०० कोटींची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गदर २ ची टीम हे यश साजरे करत असून चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमिषा पटेलने मोठ्या ब्रेकनंतर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशन आणि त्यानंतरच्या मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे सध्या अमिषा पटेल चर्चांचा भाग बनली आहे.

आता अमिषा पटेलने वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ती म्हणते तुमचे वय तुमच्या करिअरमध्ये कधीच अडथळा आणत नाही. वय फक्त आकडा आहे, ५० वर्षे सुद्धा २० वर्षासारखेच आहे.

तुमच्या प्रतिभेला कोणतीही सीमा नसते. याचे उदाहरण म्हणजे, सनी देओल ६५ वर्षांचे आहेत पण जेव्हा त्यांनी मुख्य भूमिकेत बॉलीवूड ( Bollywood )मध्ये पून्हा पदार्पण केले तेव्हा त्यांच्यासमोर सगळे फेल झाले. अमिषा पटेलचे वय सध्या ४७ वर्ष असून तिला अनेकदा तिच्या वयावरुन ट्रोल केले जाते. त्यावर तिने उत्तर दिले आहे.

पुढे बोलताना ती म्हणते, कलाकार कधीही अभिनय सोडत नसतात. ते ब्रेक घेतात. चांगले कलाकार कधीही अभिनयापासून दूर जात नाहीत.

दरम्यान 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. 'पठाण'ने 50 दिवसांत 540.51 कोटींची कमाई केली होती, तर गदरने 24 दिवसांत 500 कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, आता शाहरुखचा 'जवान' ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत असल्याने गदर २ साठीचा रस्ता कठीण होणार असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT