Kareena Kapoor: करीना मोठ्या ब्रेकनंतर पून्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आता करिना ओटीटीवर पदार्पण करत आहे. जाने जा या चित्रपटातून ती पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच जाने जा चा ट्रेलर लॉंच झाला आहे. तेव्हापासून करिना मोठ्या चर्चेत आली आहे. करिनाचा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत आहे.
आता 'जाने जा' च्या प्रमोशनमध्ये कलाकार गुंतलेले दिसून येत आहेत. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिच्या भूमिकांविषयी तिला विचारले असता करिना म्हणते मी अनेक चित्रपटात इंटेस भूमिका केल्या आहे. ओंकारा इंटेस होती मात्र तुम्ही फक्त पू आणि गीत लाच लक्षात ठेवता. या गोष्टींचा मला खूप राग येतो.
पुढे करिना म्हणते, कलाकार आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिका करु इच्छितो. मला देखील तसे वाटते आणि मी वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. मात्र सगळ्यांच्या लक्षात फक्त 'पू' आणि 'गीत' याच भूमिका लक्षात आहेत. त्यामुळे वेगळी भूमिका करणे हा विचार करुन घेतलेला निर्णय आहे.
मी दरवेळी वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मी देव, युवा, चमेली, ओंकारासारखे चित्रपट( Movie ) केले आहेत. मात्र निर्माते गीत सारख्याच भूमिका माझ्यासाठी घेऊन येतात. मात्र त्यांचा हा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करते पण मला माहीत आहे निर्माते परत माझ्यासाठी पू सारख्याच भूमिका घेऊन परत येत राहतील.
करिनाचा ओटीटीचा अनुभव काय आहे?
आपला ओटीटीवरचा अनुभव सांगताना करिना म्हणते, बॉलीवूडमध्ये २० वर्षापूर्वी जेव्हा मी डेब्यू करत होते तेव्हा मला भीती वाटत होती. आता २० वर्षानंतर ओटीटीवर डेब्यू करत आहे तर मला भीतीपेक्षा नर्व्हस वाटत आहे. मात्र सुजॉयने उत्तम चित्रपट बनवला आहे.
आम्ही कलाकारांनी मेहनत घेतली आहे. मला आणि सुजॉयला एक दशकापासून एकत्र काम करायचे होते मात्र तो योग आत्ता जुळून आला आहे. सगळेच ओटीटीवर या ना त्या माध्यमातून येत आहेत आणि उत्तम काम करत आहेत. तर मी मागे राहू नये म्हणून मीदेखील ओटीटीवर येण्याचा निर्णय घेतला असल्याचे करिना म्हणते.
सैफ अलीने करिनाला दिला गुरुमंत्र
करिनाचा हा डेब्यू चित्रपट डिव्होशन ऑफ द सस्पेक्ट या प्रसिद्ध जपानी कादंबरीवर आधारित आहे, ज्यामध्ये अभिनेते जयदीप अहलावत आणि विजय वर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
या दोघांसोबत काम करण्याच्या अनुभवावर करीना म्हणाली की, या FTII मध्ये शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांसोबत काम करायला मला भीती वाटत होती. ती म्हणते, 'मला त्यांची भीती वाटत होती, कारण ते खूप तयारी करून सेटवर येतात.'
सैफने मला आधीच सांगितले होते की तू जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबत काम करत आहेस. ते लोक सेटवर सुधारणा करणार आहेत, त्यामुळे तू तयारी कर. तू व्हॅनमधून मेकअप करून सेटवर जाऊन डायलॉग बोलणार असे तुझ्या डोक्यात असेल तर तो विचार तुला आधी बाजूला करायला पाहिजे.
करीना कपूर पुढे म्हणाली, 'सैफने मला चेतावणी दिली होती, म्हणून मी आधीच एका विद्यार्थ्याप्रमाणे गेले होते की मला शिकायचे आहे. जयदीपचा अभिनय पाहून मी अनेकवेळा माझ्या ओळी विसरायचे, असे माझ्याबाबतीत कधीच घडले नव्हते. मला वाटते की एखाद्या अभिनेत्याने इतर अभिनेत्यांना घाबरले पाहिजे, तुम्ही यातून शिकत असता.आता करीना चा ओटीटीवर डेब्यू प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.