Hanuman Chalisa Viral Video  Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: जेव्हा 3 खंडातले कलाकार हनुमान चालीसा गातात...अंगावर शहारा आणणारा विलक्षण अनुभव...

रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर हनुमान चालिसाचा रॉक व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

दैनिक गोमन्तक

Hanuman Chalisa Viral Video: आपल्या देशात भगवान हनुमानाला खुप मानले जाते. कोणतेही दु:ख किंवा संकट आले तर लोक लगेच हनुमान चालिसाचे पठण करू लागतात. 

असे बोलले जाते की हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणतीही भीती असो वा कोणताही आजार टाळण्याची क्षमता असेत. तसेच बजरंगबलीचे भक्त केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात देखील आहेत. म्हणूनच 3 खंडातील कलाकारांनी एकत्र येऊन हार्ड रॉक व्हर्जनमध्ये "श्री हनुमान चालिसा" गायली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हनुमान चालिसाचा व्हिडिओ (Video) यापूर्वी यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला आणि ऐकला जाणारा व्हिडिओ बनला होता. यावेळी हनुमान चालिसाचे जे रूप तयार करण्यात आले आहे, ते अतिशय अनोखे आहे. 

हे ऐकल्यानंतर तुमच्या आत उत्साह संचारेल आणि अंगावर शहारा आणणारा विलक्षण अनुभव देतो. हा व्हिडिओ जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती आणि सभ्यता मजबूत करणार आहे. हि चालिसा ऐकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही आल्या आहेत.

  • रॉक व्हर्जनमध्ये हनुमान चालिसा

रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान चालिसाचा हा व्हर्जन प्रसिद्ध करण्यात आला आहे. परदेशात राहणाऱ्या गिरमिट्याचे वंशज राजमोहन यांनी ते गायले आहे. 

‘डायरा म्युझिक’ या युरोपियन बँडच्या चॅनलवरून हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. नेदरलँडमधील चौथ्या पिढीतील वंशज राज मोहन, सुरीनाममधील पाचव्या पिढीतील वंशज मानव-डी आणि बिहारमधील अराह येथील रहिवासी असलेले चित्रपट निर्माते देवेंद्र सिंग यांनी ते तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या हनुमान चालिसाचे संगीत युरोपमध्ये तयार करण्यात आले आहे. तसेच याचे शूटिंग भारत, नेदरलँड आणि सुरीनाममध्ये झाले आहे.

  • हनुमान चालीसा जागतिक स्तरावर पोहोचली

डायरा म्युझिकचा मुख्य रॅप गायक मानव-डी म्हणतो की, इंडेंटर्ड मजुरांना परदेशात नेण्यात आले, पण ते त्यांची संस्कृती (Culture) आणि देशावरील प्रेम विसरले नाहीत. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर हनुमान चालीसा सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या गाण्याची उर्जा पाहून तुम्हालाही ते ऐकायला आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT