Salman khan  Dainik Gomantak
मनोरंजन

सलमानसोबतच बॉलिवूडमधील आणखी एक मोठे नाव होते बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे

दैनिक गोमन्तक

Salman Khan Threat Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठा खुलासा समोर आला आहे. सिद्धू मुसेवाला आणि मकोका प्रकरणात अडकलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ ​​महाकाल याच्या चौकशीदरम्यान काही गोष्टी समोर आल्या आहेत. बिश्नोई टोळीच्या निशान्यावर केवळ सलमान खानच नसून इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरही होता, अशी माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान महाकाळने हा खुलासा केला आहे.

सलमान खान धमकी प्रकरणी सौरव उर्फ ​​महाकाल याने पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिलेल्या जबानीनुसार, सलमान खान व्यतिरिक्त बॉलिवूडमधील चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये आहे. सौरवने पुणे पोलिसांना दिलेल्या बयाणानुसार, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला करण जोहर प्रामुख्याने जबाबदार होता आणि त्यामुळेच त्याचाही बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये समावेश झाला होता. याच कारणावरून चित्रपट निर्माता करण जोहरला धमकावून बिष्णोई टोळीने 5 कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी केली होती.

चौकशीदरम्यान सौरवने असेही सांगितले आहे की, सिग्नल अॅपद्वारे तो विक्रम ब्रारशी जोडला गेला होता आणि तो फक्त विक्रम ब्रारसाठी काम करत असे, त्यामुळे त्याला बिश्नोई टोळीच्या अनेक हालचाली आणि लक्ष्यांची माहिती होती. सध्या पुणे पोलीस महाकाळ यांच्या वक्तव्याचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि सलमान खानला धमकावणाऱ्या सौरव महाकाळला पुणे पोलिसांनी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तेरेखोल नदी ओलांडून 'ओंकार हत्ती' वाफोलीत, दोडामार्गच्या दिशेने चालला परत; Watch Video

Panaji Crime: पणजी पोलिस स्थानकासमोर राडा! 2 गटांत तुंबळ हाणामारी; 7 जणांना अटक

Goa Live News: मुसळधार पावसामुळे फूटपाथ कोसळला

Sawantwadi: सावंतवाडीत 2 गटांत राडा! मारहाण, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न; पुणे, सिंधूदुर्गातील 9 जणांना अटक

Goa politics: खरी कुजबुज; विजय-मनोज युतीने लढणार?

SCROLL FOR NEXT