Alia Bhatt Ranbir Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt's Due Date: आलिया भट्टची ड्यु डेट आली समोर; 'या' दिवशी देणार बाळाला जन्म

गोमन्तक डिजिटल टीम

Alia Bhatt's Due Date: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे कपल लवकरच आई-बाबा बनणार आहेत. मुंबईच्या गोरेगाव भागातील एच. ए. रिलायन्स रूग्णालयात आलिया-रणबीरच्या बाळाचा जन्म होणार आहे. त्यासाठी आलियाची या रिलायन्स फाऊंडेशनच्या रूग्णालयात प्रसृतीसाठी नोंदणीदेखील केली गेली आहे.

तिच्या नावाने रूग्णालयात एक रूमही बूक केली गेली आहे. आलियाला डॉक्टरांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील ड्यु डेट दिल्याचे समजते. दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर आलिया कामापासून एक मोठा ब्रेक घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास एक वर्षभर ती कामापासून दूर राहिल.

नुकतेच रणबीर आणि आलियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी त्यांच्या बाळासाठी सर्व तयारी केली आहे. एका बाळासाठी गरजेच्या ज्या वस्तू आहेत, त्या सर्वांची व्यवस्था केली गेली आहे. एक रूमदेखील तयार केली गेली आहे.

या कपलने याचवर्षी 14 एप्रिल रोजी ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. 2017 मध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत होते.

हे वर्ष आलियासाठी महत्वाचे ठरले आहे. तिने 'गंगुबाई काठियावाडी' आणि 'डार्लिंग्ज' सारखे चित्रपट यावर्षात दिले. आलियाने प्रेग्नन्सी काळातही काम केले आहे. हॉलीवूडच्या 'हार्ट ऑफ स्टोन'चे शुटिंग तिने याच काळात पुर्ण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री गेल गॅडॉट देखील आहे. नंतर 'डार्लिंग्ज'च्या प्रमोशनमध्येही ती दिसली होती. आगामी काळात आलिया रणवीर सिंगसोबत 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बुधवारपर्यंत तोडगा न काढल्यास स्थानिक आमदारांच्या दारात ओतणार कचरा

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 'मटका खुलेआम', केवळ ३१८ प्रकरणांची नोंद; 'कडक कारवाई'च्या आदेशाला वाटाण्‍याच्‍या अक्षता

Goa Drugs Case: अक्षयकुमारला ओडिशात अटक; ड्रग्‍जडिलिंग प्रकरणी पाच दिवसांची कोठडी

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

SCROLL FOR NEXT