Kriti's Look In Bhediya: डॉक्टर कृती सेनन करणार वरूण धवनवर उपचार

आगामी 'भेडिया' चित्रपटातील लूक आला समोर, ट्रेलर बुधवारी 19 ऑक्टोबर रोजी येणार
Kriti Sanon
Kriti Sanon Dainik Gomantak
Published on
Updated on

Kriti's Look In Bhediya: वरूण धवन आणि कृती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'भेडिया' या चित्रपटातील विविध कलाकारांचे लूक गेल्या काही दिवसात समोर येत आहे. चित्रपटाच्या टीमकडूनच हे लूक समोर आणले जात आहेत. मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी कृती सेननचा लूक रीलीज करण्यात आला.

Kriti Sanon
The Kashmir Files 2: काश्मिरी पंडितांवरील अत्याचार पुन्हा येणार प्रेक्षकांसमोर

कृती या चित्रपटात डॉ. अनिका ही भूमिका साकारत आहे. तिच्या लूक पोस्टरमध्ये तिच्या हातात एक इंजेक्शनही दिसते. चित्रपटात वरूणहा 'भेडिया'या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी, १९ ऑक्टोबर रोजी रीलीज होणार आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याची चर्चा आहे. यापुर्वी अशाच धाटणीचे 'स्त्री', 'रूही', 'भूलभुलैय्या' हे चित्रपट येऊन गेेल आहेत.

या चित्रपटात कृतीचा लूक नेहमीपेक्षा वेगळा आहे. तिने या चित्रपटासाठी शॉर्ट हेअऱ लूक केला आहे. एका बंदुकीसारखे दिसणारे इंजेक्शन तिच्या हातात दिसते. त्यावरून असे वाटते की, ती वरूण धवनमधील 'भेडिया'वर उपचार करणार आहे. सोमवारी या चित्रपटातील वरूण धवनचा लूक समोर आला होता.

Kriti Sanon
Ajay Devgan च्या 'दृश्यम 2' चा ट्रेलर रिलीज, यावेळी काय खास! वाचा एका क्लिकवर

बहुतांश स्थानिक कलाकारांना संधी

या चित्रपटाचे चित्रिकरण अरूणाचल प्रदेशच्या विविध भागात झाले आहे. या चित्रपटातील बहुतांश कलाकार हे स्थानिक आहेत. चित्रपटाची कथाही स्थानिक लोककथांवर आधारीत आहे. के 4 खेको या अरूणाचलमधील रॅपरचेही दर्शन या चित्रपटात होणार आहे. चित्रपटातील मुख्य थीमचे संगीत आणि गीतरचना देखील त्यानेच केली आहे.

भेडियामध्ये दीपक डोब्रियाल, अभिषेक बॅनर्जी यांच्याही भूमिका आहेत. अमर कौशिक यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शाहरूख-काजोल सोबत 'दिलवाले'मध्ये एकत्र काम केल्यानंतर कृती आणि वरूण पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान यांनी यापुर्वी वरूणच्या 'बदलापूर' या चित्रपटाचीही निर्मिती केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com