Alia Bhatt Upcoming Hollywood Movie
Alia Bhatt Upcoming Hollywood Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Heart of Stone: लवकरच हॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार आलिया भट्ट

दैनिक गोमन्तक

'गंगूबाई' आणि 'आरआरआर' चित्रपटांच्या यशानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आता पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आलिया भट्ट आता आपल्या चार्मने आंतरराष्ट्रीय चाहत्यांना वेड लावणार आहे. (Alia Bhatt will be seen in the Hollywood movie Heart of Stone)

आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की ती तिच्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे आणि त्यासाठी ती खूप घाबरत आहे.

आलिया भट्ट नेटफ्लिक्सच्या स्पाय थ्रिलर 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये (Heart of Stone) दिसून येणार आहे आणि शूटिंगसाठी तिने फ्लाइट घेतली आहे. या चित्रपटात ती गल गॅडोटसोबत दिसून येणार आहे. तसेच टॉम हार्पर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये आलिया भट्ट कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल, याचा खुलासा अद्याप झालेला नाहीये. गल गॅडोटने या चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू केले, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता आलियाचे चाहते तिचे सेटवरील फोटो व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट नुकतीच 'गंगूबाई', 'RRR' या चित्रपटांमध्ये दिसून आली. याशिवाय तिचे चाहते रणबीर कपूरसोबतच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT