‘टेक इट ईझी’ चित्रपट साखळी रवींद्र भवनमध्ये

Take It Easy: हे नातेसंबंध हा केंद्रबिंदू धरून निर्माण झालेला ‘टेक इट ईझी’ हा हिंदी सिनेमा देशातील 7 प्रतिष्ठित चित्रपट (Movie) महोत्सवात दाखवण्यात आलेला आहे
goa
goa Dainik Gomantak

पालक आणि पाल्य यांच्यामधले नातेसंबंध हे अनेकदा ताणतणावाचे असतात. मुलांचा कल व्यवस्थित समजून घेतला नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्व हरवून जाण्याचा संभव असतो आणि त्यांच्यामधल्या नात्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. हे नातेसंबंध हा केंद्रबिंदू धरून निर्माण झालेला ‘टेक इट ईझी’ हा हिंदी सिनेमा देशातील 7 प्रतिष्ठित चित्रपट (Movie) महोत्सवात दाखवण्यात आलेला आहे. या चित्रपटाला अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत.

या चित्रपटाचा (Movie) एक विशेष प्रयोग शनिवार 21 मे रोजी साखळी येथील रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचे नैसर्गिक कलागुण कसे चिरडले जातात व त्यामुळे त्यांचे हास्य कसे लोप पावते यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो.

मुलांचा नैसर्गिक कल व त्यांच्यातील उपजत कला गुण यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पालकांनी प्रेरित झाले पाहिजे, असा संदेश हा चित्रपट देतो

goa
काशीतील प्रत्येक भागामध्ये 'शिवाचे' वास्तव्य: कंगना रनौत

सुनील व्यास दिग्दर्शित या चित्रपटात विक्रम गोखले, सुलभा आर्य, अनंग देसाई, राज झुत्शी या ज्येष्ठ कलाकारांबरोबरच यश घाणेकर व प्रसाद रेड्डी या बालकलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. रवींद्र भवनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला या चित्रपटाचा खेळ सर्वांसाठी खुला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com