Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

आलिया भट्टने शेयर केलेले रोमॅंटिक फोटो तुम्ही पाहिलेत का ?

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर तीन फोटो शेयर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. 14 एप्रिल 2022 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. आलिया भट्टने पती रणबीर कपूरसोबतचे रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. (Alia Bhatt shares romantic photos with Ranbir Kapoor on Instagram)

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर तीन फोटो शेयर केले आहेत. पहिल्या फोटोत तीने लाल रंगाच्या ड्रेस घातला आहे. दुसऱ्या छायाचित्रात रणबीर आलियाला हातात धरून बसलेले दिसत आहे. तिसरा फोटो लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीचा आहे. दोघांच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

साधेपणाने केले लग्न
आलिया आणि रणबीर कपूर यांनी गेल्या महिन्यात अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले. दोघांनी लग्नासाठी कोणतेही डेस्टिनेशन निवडले नाही, तर लग्नासाठी त्यांच्या घराची वास्तू निवडली. या लग्नाला कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती. आलिया भट्टचा वेडिंग लूकही अतिशय साधा होता. आलिया भट्टने लेहेंग्याऐवजी हाताने पेंट केलेली केशरी रंगाची साडी नेसली होती.

दोघेही 'या' चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त
आलिया भट्ट करण जोहर, धर्मेंद्र, रणवीर सिंग, शबाना आझमी आणि जया बच्चन स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय आलिया भट्ट कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत 'जी ले जरा' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याचवेळी रणबीर कपूर त्याच्या आगामी 'एनिमल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय रणबीर कपूर वाणी कपूर आणि संजय दत्तसोबत 'शमशेरा' चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT