Ranbir Kapoor and Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

रणबीर कपूरसोबतच्या लग्नाबाबत आलिया भट्टने सांगितली 'ही' मोठी गोष्ट

याच कारणामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील अनेक कपल दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर लग्न करत आहेत. याच कारणामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या, मात्र प्रत्येक वेळी या बातम्या केवळ अफवा ठरतात. दोघेही जवळपास चार वर्षांपासून गंभीर रीलेशनमध्ये आहेत. शेवटी, या कपलचे लग्नाबद्दल काय विचार आहेत? या प्रश्नाचे उत्तर आलिया भट्टने (Alia Bhatt) दिले आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Latest News)

एका मुलाखतीत ती म्हणाली, 'माझ्या मनात रणबीर कपूरशी (Ranbir Kapoor) लग्न झाले आहे आणि मला असे वाटते की मी खूप आधीपासून त्याच्याशी लग्न केले आहे. मला वाटतं प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. लग्नाची वेळ आली की ती अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली जाईल.

तसे, 2020 च्या सुरुवातीला, रणबीर कपूरने एका मुलाखतीत आलियाचे वर्णन करताना या नात्याची पुष्टी केली होती आणि सांगितले होते की जर कोरोना नसता तर त्याने 2020 मध्येच आलियाशी लग्न केले असते. यानंतर दोघेही अनेकदा एकमेकांबद्दलचे प्रेम जाहीरपणे व्यक्त करताना दिसले आहेत. आलिया अनेकदा रणबीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

कामाच्या आघाडीवर, आलियाचा पुढचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यानंतर ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या अॅनिमल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT