Alia Bhatt- Ranbir Kapoor Baby Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt- Ranbir Kapoor Baby: कपूर कुटुंब पुन्हा गुंजले, आलियाने दिला एका मुलीला जन्म

आलिया भट्टला कन्यारत्न झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt- Ranbir Kapoor Baby: बॉलिवूडमधील चाहत्यांचे सर्वात लाडके कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आई-वडील झाले आहेत. मुंबईतील KHN रिलायन्स रुग्णालयात आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर संपूर्ण कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आलियाला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहते आलियाला अनेक शुभेच्छाही देत ​​आहेत

  • आलिया-रणबीर या वर्षी लग्नबंधनात अडकले

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर याचवर्षी 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने त्यांच्या घरी झाले. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. आलियानं काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं. 

  • आलिया घेणार ब्रेक

बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire: गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

Mapusa Accident: म्हापसात भीषण अपघात! 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT