Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: 'अन् गंगुबाई दिसणार नव्या भूमिकेत!' अभिनयासह आता 'या' क्षेत्रात आलिया आजमावणार नशीब

Alia Bhatt: गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'डार्लिंग्स' या चित्रपटाद्वारे आलियाने ओटीटीच्या जगात पहिले पाऊल ठेवले.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मग त्यांचे चित्रपट असो किंवा त्यांचे वैयक्तिक आयुष्य, कधीकधी हे कलाकार त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. आता बॉलीवूडची बार्बी गर्ल गंगूबाई काठियावाडी फेम आलिया भट्ट या चर्चांचा भाग बनली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्टची वेब सीरीज पोचर या महिन्यात ओटीटीवर धडकणार आहे. 23 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना ही वेब सीरीज OTT प्लॅटफॉर्म अॅमॅझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.

याबरोबरच, आलियाने 'पोचर' नावाच्या चित्रपटासाठी 'दिल्ली क्राइम'चे दिग्दर्शक रिची मेहतासोबत हातमिळवणी केली आहे. 'पोचर' मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रसारित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राइम व्हिडिओने 6 फेब्रुवारीला याची घोषणा केली आहे. ही एक डिटेक्टिव्ह गुन्हेगारी वेबसीरीज असून सत्य घटनेवर आधारित असेल. आलिया या मालिकेशी कार्यकारी निर्माता म्हणून जोडली गेली आहे.

आलिया भट्ट प्रॉडक्शन हाऊस 'इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन'ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर 'पोचर'चा फर्स्ट लूक शेअर केला आणि लिहिले, 'शांततेच्या काळात, जंगलात एक घातक षडयंत्र उघड होते आणि शिकारीचा शोध सुरू होतो.

आलिया भट्टने याआधीही आपला अभिनय कौशल्य सिद्ध केला आहे. 'हायवे' चित्रपट असो किंवा 'राझी', 'गली बॉय' आणि 'गंगूबाई काठियावाडी' प्रत्येक चित्रपटात ती वेगवेगळी भूमिका करून स्वतःला आव्हान देत राहते आणि उत्तम अभिनय करते. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'डार्लिंग्स' या चित्रपटाद्वारे आलियाने ओटीटीच्या जगात पहिले पाऊल ठेवले. त्यात तिने अभिनयही केला आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खान, गौरव वर्मा यांच्यासोबत चित्रपटाची निर्मितीही केली. 

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'लव्ह अँड वॉर' असे असेल. पती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'ब्रह्मास्त्र 2' देखील आहे. करण जोहरचा 'जिगरा' या चित्रपटातदेखील ती महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT