Alia Pregnancy Fashion Insta/Alia
मनोरंजन

Alia Pregnancy Fashion: गरोदरपणातही आलियाचा फॅशन ट्रेंड जोरात, बेबी बंप लपवण्यासाठी...

आलियाच्या हिल्सची किंमत 44,500 रुपयांपेक्षा जास्त, चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमधील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Pregnant Alia Bhatt's Stylish Fashion At Brahmastra Event: आलिया तिच्या गर्भधारणेच्या टप्प्याचा आनंद घेण्यासोबतच, आलिया भट्ट सध्या व्यावसायिक क्षेत्रात देखील खूप अॅक्टिव्ह आहे. नुकताच आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमधील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या चित्रपटाबद्दल खूप एक्साईटेड आहे. चाहत्यांमध्ये देखील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल चर्चा आणि उत्साह आहे. या दोघांना पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अलीकडेच, या कपलला चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकत्र पाहिले गेले होते जिथे आलिया एका रंगीबेरंगी फंकी प्रिंटेड टी-शर्टमध्ये आकर्षक दिसत होती.

तिने कॅज्युअल ओव्हरसाईज टी-शर्ट घातला होता, ज्यामधून तिने तिचा बेबी बंप पूर्णपणे कवर केला होता. यासोबत तिने स्काय ब्लू ब्रॉड हील्स घातल्या होत्या. प्रमोशनदरम्यान आलियाने ज्या प्रकारे उत्साह दाखवला त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही तिच्या लूकची खूप प्रशंसा केली जात आहे.

आलियाची फॅशन सर्वात हटके

सर्वांना माहिती आहे की, गरोदरपणात आलिया स्वत:साठी हटके कपडे सिलेक्ट करत आहे. कार्यक्रमादरम्यान बेबी बंप कवर करण्यासोबतच तिला स्टायलिश दिसावे लागते, ज्यासाठी तिने असा लूक कॅरी केला आहे. आलियाच्या या टी-शर्टची किंमत 4 हजारांपेक्षा जास्त आहे. त्याचबोरबर तिच्या हिल्सची किंमत 44,500 रुपयांपेक्षा जास्त आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त मौनी रॉय, अमिताभ बच्चन हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचाही कॅमिओ असणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलिज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हायरल होण्यासाठी काहीही? भर बाजारात तरूणीचा टॉवेलवर डान्स! नेटकरी भडकले

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

SCROLL FOR NEXT