श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वजण गोपाळाचा जन्म साजरा करत आहेत. लीलाधर भगवान श्रीकृष्ण प्रत्येक रूपात आराध्य दिसतात तसेच 16 कलांमध्ये पारंगत देखील मानले जातात. पौराणिक मालिकांमध्येही भगवान श्रीकृष्णाच्या कला आणि गुण चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्री कृष्णावर आधारित अनेक शो चालविण्यात आले आहेत, तसेच या शोमध्ये श्री कृष्णाची भूमिका करणारे स्टार्सही खूप लोकप्रिय झाले आहेत. कोण आहेत ते स्टार्स, जाणून घेऊया... (Actors have become popular by playing the role of Lord Krishna)
सर्वदमन बॅनर्जी
सर्वदमन बॅनर्जी (Sarvadaman D. Banerjee) हे टीव्हीवर श्री कृष्ण बनलेल्या सुरुवातीच्या अभिनेत्यांपैकी एक आहेत तर रामानंद सागर यांच्या 1993 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'कृष्णा' या मालिकेत त्यांनी भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. याआधी त्यांनी काही चित्रपटांमध्ये पौराणिक व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.
नितीश भारद्वाज
अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) हे टीव्हीवरील सर्वाधिक पसंतीचे आणि लोकप्रिय कृष्णांपैकी एक आहेत तर बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. नितीश यांनी ही व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली होती तर याच कारणामुळे ते आजही या व्यक्तिरेखेसाठी सर्वाधिक ओळखले जातात. नितीश भारद्वाज हे भारतीय जनता पक्षाचे जमशेदपूरचे खासदारही राहिले आहेत.
सौरभ राज जैन
अभिनेता सौरभ राज जैन (Sourabh Raaj Jain) यानेही श्रीकृष्णाची भूमिका साकारून खूप यश मिळवले आहे. 2013 मध्ये स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या 'महाभारत'मध्ये तो कृष्णाच्या भूमिकेत दिसून आला होता. तसेच, हा कार्यक्रम नव्या युगातील प्रेक्षकांनाही खूप आवडला होता.
सुमेध मुदगलकर
'राधाकृष्ण' या लोकप्रिय पौराणिक शोमध्ये भगवान कृष्णाच्या भूमिकेत सुमेध मुदगलकरला (Sumedh Mudgalkar) खूप पसंती मिळाली तर हा स्टार भारत शो वर प्रसारित होत होता. राधा आणि श्रीकृष्णाच्या प्रेमकथेवर आधारित हो शो होता. शोमध्ये सुमेध कृष्णाच्या भूमिकेत दिसला, तर मल्लिका सिंह राधाच्या भूमिकेत दिसून आली होती. या मालिकेतील सुमेधच्या छोट्या क्लिपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल झाल्या आहेत.
विशाल करवाल
अभिनेता विशाल करवाल (Vishal Karwal) याने 'द्वारकाधीश-भगवान श्री कृष्ण' या मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती तर या व्यक्तिरेखेमध्ये चाहत्यांना तो फार आवडला होता. त्याच्या हसण्याने त्याने या व्यक्तिरेखेला मोहिनी घातली होती.
स्वप्नील जोशी
अभिनेता स्वप्नील जोशीही (Swapnil Joshi) भगवान कृष्णाच्या पात्रात सामील झाला. रामानंद सागर यांच्या शो 'श्री कृष्णा'मध्ये त्याने कान्हाची भूमिका साकारली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.