Alia Bhatt Viral Video  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt : आलिया भट्टचा 14 वर्षे जुना व्हिडीओ होतोय व्हायरल.. या चित्रपटासाठी दिली होती ऑडिशन

अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

आलिया भट्ट बॉलीवूडची एक चुलबुली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कित्येकदा यूजर्स आलियाच्या बोलण्याची मजा घेतानाही दिसतात. पण एक कलाकार म्हणून आलियाने आजवर केलेलं काम उल्लेखनिय असंच आहे.

हायवे, गंगूबाई काठियावाडी, गली बॉय या चित्रपटातून आलियाने साकारलेली पात्रांचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केलं होतं.

नुकतेच आपला लाडका पती रणबीरच्या वाढदिवसाचे फोटो आलियाने सोशल मिडीयावर शेअर केले होते. आता आलिया एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटीझन्सच्या चर्चेचं कारण ठरली आहे.

स्टुडंट ऑफ द इयरमधून पदार्पण

आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणाऱ्या आलियाने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून अभिनयाच्या दुनियेत एंट्री केली होती. पण या चित्रपटापूर्वीही तिने कित्येक चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिल्या होत्या.  

या सिनेमांमध्ये रणबीर कपूरच्या 'वेक अप सिड'चाही समावेश आहे. त्यावेळी आलिया फक्त 16 वर्षांची होती. आता त्याच्या ऑडिशनचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

वेक- अप सीडच्या ऑडिशनचा व्हिडीओ

अयान मुखर्जी दिग्दर्शित वेक अप सिड'14 वर्षांपूर्वी 2009 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच कोंकणा सेनने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

'वेक अप सिड'ची आठवण निघण्याचं कारण म्हणजे आलियाचा हा व्हिडीओ याच चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटासाठी आलियाची निवड झाली असती तर रणबीरसोबत कोंकणाऐवजी आलिया भट्ट दिसली असती. 

'वेक अप सीड'साठी आलियाने दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ एकदा पाहाच. आलिया या चित्रपटात खूपच लहान दिसत आहे. त्यावेळी रणबीर 27 वर्षांचा होता आणि आलिया फक्त 16 वर्षांची होती.

आलियाचे मजेदार संवाद

या ऑडिशन व्हिडिओमध्ये आलिया भट्ट काही संवाद बोलताना दिसते हे संवादही मोठे मजेदार आहेत, 'माझे फोटो काढू नका, मला फोटो क्लिक करायला आवडत नाहीत. कारण मी फोटोंमध्ये वाईट दिसत आहे.

 या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये चित्रपटातील रणबीरचे सीन्सही आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, आलिया खूपच क्यूट दिसत आहे.

आलियाने नंतर मागे वळून पाहिले नाही

आलियाने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट्स ऑफ द इयर' चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्यासोबत या चित्रपटासाठी 500 मुलींनीही ऑडिशन दिले होते. या चित्रपटासाठी आलियाने 16 किलो वजनही कमी केले आहे.

 हा चित्रपट खूप गाजला आणि आलियालाही पसंती मिळाली. यानंतर आलियाने पुढच्या अनेक चित्रपटांत केलेला अभिनय प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT