Akshay Kumar Instagram
मनोरंजन

Akshay Kumar : भस्म लावलेले भोलेनाथ पाहिलेत का? अक्षय कुमारचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ओ माय गॉडचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ओह माय गॉड 2 सिनेमांमुळे चर्चेत आहे. त्याचे सलग ५ सिनेमे फ्लॉप झाले त्यामुळे तो चर्चेत होताच आता त्यात त्याचे बरेच सिनेमे हे प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

चाहत्यांना खूप अपेक्षा

अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ओह माय गॉड 2 कडून अक्षय आणि त्याच्या चाहत्यांना खुप अपेक्षा आहेत. त्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि या चित्रपटासंबधित अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सुकही आहेत. आता अक्षयने चाहत्यांची अपेक्षा आणखी वाढवली आहे.

अक्षय कुमारचा लूक

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार गर्दीतून पुढे येताना दिसत आहे आणि लोक हर हर महादेवचा जयघोष करत आहेत. डोक्यावर जटा, कपाळावर भस्म, गळ्यात नील आणि रुद्राक्षाची माळ घातलेला अक्षय कुमार बाबा भोलेनाथसारखा पोशाख घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओसोबत अक्षय कुमार मुव्हीजने कॅप्शनही दिले आहे.अभिनेत्याने लिहिले - 11 जुलै रोजी #OMG2 टीझर. 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात #OMG2

चित्रपट लवकरच प्रदर्शित

याचबरोबर OMG 2 च्या टीझरची रिलीज डेट 11 जुलै असेल असं सांगितली आहे. बातमीनुसार, 1 मिनिट 34 सेकंदाच्या टीझरला यू प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे निर्माते लवकरच तो प्रदर्शित करणार आहे. ओ माय गॉड 2 मध्ये अक्षय कुमार भगवान महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यामी गौतम वकिलाच्या भुमिकेत आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 सोबतच Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसेल. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी 3' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT