Akshay Kumar's new movie OMG 2 poster released Instagram /@akshaykumar
मनोरंजन

OMG Release Date : खिलाडी कुमार घेऊन येतोय हा नवा चित्रपट, या दिवशी होणार रिलीज

अभिनेता अक्षय कुमारचा नवा चित्रपट ओह माय गॉड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

Rahul sadolikar

अक्षयच्या चाहत्यासांठी एक खुशखबर आहे. बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्याने एक पोस्टर शेयर करत त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयचे गेल्या वर्षभरात अनेक चित्रपट फ्लॉप गेले, पण ऐकेल तो अक्षय कसला. त्याने लगेचच एका नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

ज्या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून सोडलं, भक्ती आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक दाखवला, जो तूफान हिट झाला असा 'OMG' हा चित्रपट सर्वांनाच ठाऊक असेल. या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच दूसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच अक्षयने 'OMG 2' ची घोषणा केली

अक्षयने शेअर केले पोस्टर

नुकतेच अक्षयने एक पोस्टर शेयर केले आहे. यावेळी अक्षय कुमारने शेअर केलेल्या पोस्टवरवर अक्षय भगवान शिवाच्या रुपात दिसत आहे. लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू असा अक्षयचा दमदार लुक समोर आला आहे.

सोबतच अक्षयने चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. 'OMG 2' (O MY GOD 2 ) असे या चित्रपटाचे नाव असून येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पहिला भाग चांगलाच चालला होता

या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार सोबत परेश रावल, मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयानेही लक्ष वेधले होते. तर दुसऱ्या भागातही अशीच दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

य चित्रपटात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच अनेक कलाकार आणि भन्नाट विषय पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard Cub Rescued: आधी वाटले कुत्र्याचे पिल्लू, नंतर निघाला बिबट्याचा बछडा; खांडेपार येथील घटना, Watch Video

Chorao Ro Ro Ferry Pass: चोडणवासीयांना 'रो-रो फेरी' महागली! प्रतिट्रीप 5 रुपयांची वाढ; पास होणार वितरित

Chimbel Viral Video: चिंबल येथील पंचसदस्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ! CM सावंतांचे वेधले लक्ष; ग्रामसभेत होणार चर्चा

Goa Live News: गोंयात कोळसो नाका!

Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

SCROLL FOR NEXT