गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन विश्वात ओएमजी आणि गदर या चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये पुढील महिन्यात मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. ऑगस्टमध्ये पाच पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोण बाजी मारणार याची चाहत्यांना, प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. यासगळ्यात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सनी देओल यांच्यात जोरदार टक्कर दिसून येणार आहे.
तब्बल दोन दशकांनंतर सनी देओलच्या गदर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमिशा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध याविषयावर प्रेमकथेच्या माध्यमातून भाष्य गदर २ मधून करण्यात आले आहे.सोशल मीडियावर हा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित विषय दोन्ही ट्रेडिंगचा विषय आहे.
दुसरीकडे खिलाडी अक्षय कुमारचा ओह माय गॉड देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले होते. देव विरुद्ध मानव यांचा संघर्ष थेट कोर्टापर्यत गेला आणि त्यातून जे समोर आले ते प्रभावीपणे ओह माय गॉडमधून मांडण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या पार्टमध्ये देखील तोच विषय घेऊन प्रेक्षकांपुढे आगळी वेगळी कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न मेकर्सकडून करण्यात आला आहे.
अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ओह माय गॉडला गदर २ मोठा फटका बसू शकतो अशा चर्चांना उधाण आले आहे. ओह माय गॉडपूर्वी सनीच्या गदरची चर्चा आहे. तेव्हा अक्षयनं गदर २ नंतर चित्रपट प्रदर्शित करावा. असेही नेटकऱ्यांनी अक्षयला सुचवले आहे. सध्या सोशल मीडियावर ओएमजी२ मधील नवे गाणे व्हायरल झाले आहे. त्यात अक्षय हा भगवान शंकराच्या भूमिकेत आहे.
अक्षयचे ते तांडव पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अक्षयच्या नव्या चित्रपटासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय आणि सनीचा चित्रपट अकरा ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील प्रश्न पडला आहे की, दोन्ही सेलिब्रेटींनी एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
दुसरीकडे गदर २ मधील आणखी एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले असून चाहत्यांना ते कमालीचे आवडले आहे. त्यात सनी आणि अमिषाचा वेगळा लूक चर्चेचा विषय आहे. यासगळ्यात बॉक्स ऑफिसवर कुणाचा वरचष्मा राहणार, कोण जिंकणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.