OMG 2 Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Oh My God 2 Collection : अखेर अक्षयच्या 'ओ माय गॉड'नेही पार केला 100 कोटींचा आकडा....

अभिनेता अक्षय कुमारच्या ओ माय गॉड चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये अखेर प्रवेश केला आहे.

Rahul sadolikar

OMG 2 Box Office collection: अभिनेता अक्षय कुमारच्या ओ माय गॉड 2 या चित्रपटाची गाठ यावेळी सनी देओलच्या गदरशी पडली होती. गदरच्या कमाईच्या तुलनेत हा चित्रपट स्पर्धा करु शकला नसला तरी चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

ओ माय गॉड 2 या चित्रपटाने शुक्रवारी ₹1.7 कोटी कमावल्यानंतर शनिवारी त्याची कमाई दुप्पट केली. OMG 2 ने शनिवारी सुमारे ₹3.25 कोटी कमावले.

16 दिवसांतील कमाई

ओह माय गॉड 2 (OMG 2) ने 16 दिवसांमध्ये सिनेमागृहात भारतात ₹ 130 कोटींचा टप्पा ओलांडला आहे . Sacnilk.com च्या अहवालानुसार , OMG 2 ने शनिवारी त्याच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ₹ 3 कोटींहून अधिक कमाई करून कमाईत वाढ केली. 

OMG 2, जो अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या 2012 मधील OMG - ओह माय गॉड या चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. यात अक्षय, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.

सॅकनिकचा अहवाल

Sacnilk.com ने नोंदवलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, OMG 2 ने चित्रपटगृहांमध्ये(Film Theater ) तिसर्‍या शनिवारी सर्व भाषांमध्ये भारतात ₹ 3.25 कोटी नेट जमा केले . अक्षय कुमारच्या चित्रपटाने तिसर्‍या शुक्रवारी सुमारे ₹ 1.7 कोटींची कमाई केली होती . 

चढता आलेख

मिळालेल्या माहितीनुसार OMG 2 ची एकूण कमाई 16 दिवसांनंतर थिएटरमध्ये सुमारे ₹ 131.37 कोटी इतकी आहे. चित्रपटाने ₹ 10.26 कोटींची सुरुवात केली होती आणि पहिल्या आठवड्यात सर्व भाषांमध्ये ₹ 85.05 कोटी कमाई केली होती. OMG 2 ची दिवसानुसार सर्वाधिक कमाई 5 व्या दिवशी ₹ 17.1 कोटी होती.

दिग्दर्शन आणि निर्मिती

OMG 2 चे दिग्दर्शन(Direction) अमित राय यांनी केले आहे आणि वायकॉम 18 स्टुडिओ, वाकाओ फिल्म्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स द्वारे निर्मित आहे. OMG 2 च्या यशाने उंच भरारी घेत असलेला अक्षय कुमार शनिवारी त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे पोहोचला आहे.

अक्षयचे आगामी चित्रपट

त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव स्काय फोर्स आहे. मात्र, या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

याशिवाय अक्षयकडे सोराराई पोत्रूचा अद्याप नाव नसलेला हिंदी रिमेक देखील आहे , जो फेब्रुवारी 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राधिका मदन आणि परेश रावल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

अक्षयचा बडे मियाँ छोटे मियाँ 

अक्षय टायगर श्रॉफ सोबत बडे मियाँ छोटे मियाँ या अॅक्शन चित्रपटात देखील दिसणार आहे , जो 2024 च्या ईदच्या आसपास रिलीज होणार आहे. अक्षय त्याच्या हिट कॉमेडी फ्रँचायझी हाऊसफुलच्या पाचव्या भागासाठी रितेश देशमुखसोबत पुन्हा एकत्र येणार आहे.

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

India Squad Announcement: रोहित- विराटचं कमबॅक, शुभमन गिलकडे संघाची कमान; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

SCROLL FOR NEXT