Actress Twinkle Khanna with UK Prime Minister Rishi Sunak : अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्ना सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत एका कार्यक्रमातले फोटो व्हायरल झाल्यानंतर अक्षय- ट्विंकलच्या चाहत्यांना एक सरप्राईज मिळाले आहे.
लंडन युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठित गोल्डस्मिथ्समध्ये नुकतेच फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केलेल्या ट्विंकलने बुधवारी इंस्टाग्राम रील्सवर या कार्यक्रमात इटालियन टेनर अँड्रिया बोसेलीचा व्हिडिओ मॉन्टेज शेअर केला.
त्यात ट्विंकल आणि अक्षयचा ऋषी सुनकसोबत पोज देतानाचा फोटोही होता. यावेळी ट्विंकलसह अक्षय कुमार ऑफिशियल पोषाखात होते.
तिच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने इव्हेंटसाठी हाय हिल्स घालण्याची खिल्ली उडवली. तिने लिहिले, “मला हील्स घालणे आणि कपडे घालणे जितके आवडत नाही, आजची संध्याकाळ सर्व खराब झालेल्या पायाच्या बोटांसाठी उपयुक्त होती.
आपल्या पोस्टमध्ये लेखिका आणि समाजसेविका सुधा मुर्ती यांना टॅग करत लिहिले @sudha_murthy_official हे माझे हिरो होते, पण तुमच्या जावयाला, पंतप्रधानांना भेटून खूप छान वाटले @rishisunakmp @andreabocelliofficial ऐका. अभिनंदन @anusuya12 आणि @theowo.london .”
2021 मध्ये, तिच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ट्वीक इंडियाच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त, ट्विंकलने सुधा मूर्ती यांची मुलाखत घेतली होती आणि दोघांनी त्यांचं काम, करिअर यावर चर्चा केली होती.
त्यांच्या चर्चेदरम्यान ट्विंकल म्हणाली होती की, काही वेळा चांगल्या घरातून आलेल्या मुलांमध्ये काही प्रमाणात अपराधीपणाची भावना असते.
तिने सुधा मुर्तींना विचारले की तिची मुलेही त्यांच्यासारखीच नम्र राहतील याची खात्री त्यांनी कशी केली?
ट्विंकलने 1995 मध्ये बरसातमधून अभिनय करिअरची सुरुवात केली. 2001 च्या 'लव के लिया कुछ भी करेगा' चित्रपटानंतर तिने अभिनय करिअर सोडले. 2015 मध्ये, ट्विंकलने मिसेस फनीबोन्समधून लेखिका म्हणून पदार्पण केले .
2017 मध्ये, ती द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद नावाचा कथासंग्रह घेऊन आली. तिची काल्पनिक कादंबरी पायजामा आर फॉरगिव्हिंग 2018 साली प्रकाशित झाली.