Raksha Bandhan Trailer Video/screenshot
मनोरंजन

'Raksha Bandhan' हुंडा प्रथेवर बोलणार, अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल का?

अक्षय कुमार स्टारर चित्रपट रक्षाबंधन या हुंडा प्रथेबद्दल जनजागृती करताना दिसणार

दैनिक गोमन्तक

Raksha Bandhan Trailer: 'माझ्या लग्नासाठी पैसे कुठून आणले? दुकान गहाण ठेवले आहे... माझ्या लग्नासाठी दुकान गहाण ठेवले आहे, मग या तिघांचे लग्न कसे होणार? काळजी करू नका, तुमच्याकडे अजून दोन किडनी बाकी आहेत.' अशा आशयाचे डायलॉग असलेला अक्षय कुमार स्टारर चित्रपट रक्षाबंधन या हुंडा प्रथेबद्दल जनजागृती करताना दिसणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' नंतर अक्षय कुमारचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे. अक्षय कुमारचे चाहते त्याच्या 'रक्षाबंधन' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. चाहत्यांचा उत्साह वाढवत 'रक्षा बंधन' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

छोट्या शहरात हुंडा आणि मोठ्या शहरांमध्ये भेट

हुंडा प्रथा बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बनले असले तरी रक्षाबंधन वेगळे कसे असणार? याला उत्तर देताना दिग्दर्शक आनंद एल राय म्हणतात, यासाठी संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल. त्यानंतर त्यावर चर्चा होऊ शकते. विषय जुना असेल पण समस्या तशीच आहे. छोटय़ा गावांमध्ये आणि शहरांमध्ये हुंडाबळी प्रचलित असली तरी मोठे शहरही यापासून सुटली नाही. इथे फरक फक्त वर्गाचा आहे, इथे हुंडा हा शब्द गिफ्टने बदलला आहे. उच्चवर्गीय लोकांनी भेटवस्तूंची देवाणघेवाण करून विनाकारण गरीब वडिलांवर दबाव टाकणे थांबवावे, असा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रक्षाबंधन हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती, परंतु निर्मात्यांनी हे वृत्त पूर्णपणे नाकारले.

अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याचे चाहते खूप खुश दिसत आहेत. अक्षयच्या मागील दोन चित्रपटांच्या तुलनेत हा रक्षाबंधन बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र, अक्षयचा हा चित्रपट किती अपेक्षा पूर्ण करतो, हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Helicopter Crash: इराणमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर अणुकेंद्राजवळ कोसळलं! पायलटसह 4 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Vyatipat Yog: होळीनंतर 3 राशींना 'व्यतिपात' योगाचा फटका! सूर्य-चंद्राची युती ठरणार भारी; आर्थिक नुकसानीचे संकेत

T20 World Cup: "वेग कमी करा, भारतीय बॅट्समनना आउट करा"! लुंगी एन्गिडीने सांगितले टेक्निक; इंडियन्सना चकवण्याचे अस्त्र केले उघड

Black Panther: ब्लॅक पॅंथरची दहशत वाढली! पाळीव प्राण्याचा पाडला फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण

VIDEO: अभिषेक शर्माची 'गंभीर' शाळा! सलग फ्लॉप शो नंतर हेड कोच संतापला, बसमधील 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल

SCROLL FOR NEXT