वामिकाला स्पॉटलाईटपासून दूर ठेवण्याचे कारण अनुष्कानं केले स्पष्ट

Anushka Sharma: एका मुलाखतीमध्ये अनुष्कानं वामिकाला स्पॉटलाइटपासून दूर ठेवण्याचं कारण सांगितलं होतं.
Anushka Sharma| virat kohli |Vaamika
Anushka Sharma| virat kohli |VaamikaDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांना गेल्या वर्षी कन्यारत्न झालं. अनुष्का आणि विराटनं त्यांच्या मुलीचे नाव वामिका (Vamika Kohli) असं ठेवलं. अनुष्का आणि विराट हे सोशल मीडियावर वामिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. पण त्यांच्या पोस्टमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही. विराट आणि अनुष्कानं वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये अनुष्कानं वामिकाला स्पॉटलाईटपासून दूर ठेवण्याचं कारण स्पष्ट केले होते. (anushka sharma shared why virat kohli she not raise vamika media News)

2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्का म्हणाली, 'आम्ही याचा खूप विचार केला आहे. आम्ही आमच्या मुलीला लोकांच्या नजरेत राहावं, असं वाढवणार नाही. तिने सोशल मीडियामध्ये गुंतून रहावं, असं आम्हाला वाटत नाही. अनुष्का आणि विराट यांच्या सोशल मीडिया पोस्टला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. 2017 मध्ये अनुष्का आणि विराट लग्नबंधनात अडकले. 2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होता.

Anushka Sharma| virat kohli |Vaamika
World Music Day 2022: 'या' प्रसिध्द गायकांनी या वर्षी घेतला जगाचा निरोप

अनुष्काने बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुन्हा दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटत अनुष्का क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com