Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar: तुटलेल्या नात्यानंतर रवीना टंडनबरोबर काम करण्याविषयी अक्षय कुमार म्हणाला...

Akshay Kumar: आमची जोडी हिट आहे. मोहरापासून ते अनेक चित्रपट आम्ही हिट केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Akshay Kumar: अक्षय कुमार सध्या त्याच्या नुकत्याच आलेल्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुरु असलेल्या मुलाखतीदरम्यान रवीना टंडनसोबत अनेक वर्षांनंतर काम करण्याबाबत त्याने मौन सोडले आहे.

एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि रवीना टंडन त्यांच्या कामामुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते. केवळ डेटिंगच नाही तर दोघांचा साखरुपुडादेखील झाला होता. पण नंतर त्यांचे नाते तुटले. आता रवीना आणि अक्षय वेलकम टू जंगल या चित्रपटात एकत्र काम करणार आहेच, त्यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता अक्षय कुमारने यावर आपले मत व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने रवीना टंडनसोबत काम करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोक त्याची एवढी चर्चा का करत आहेत, असा प्रश्न पडला असून, 'आम्ही दोघे वेलकम टू द जंगल नावाचा चित्रपट एकत्र करत आहोत. ज्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. आम्‍ही दोघांनी मिळून अनेक उत्‍तम चित्रपट( Movie ) केले आहेत जे हिटही झाले आहेत. आता बऱ्याच दिवसांनी आम्ही पुन्हा पडद्यावर परतत आहोत असे अक्षय कुमारने म्हटले आहे.

रविना टंडन काय म्हणाली ?

याआधी रवीना टंडननेही एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारसोबत काम करण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा तो म्हणाला होता, 'आमची जोडी हिट आहे. मोहरापासून ते अनेक चित्रपट आम्ही हिट केले आहेत. आम्ही भेटतो आणि बोलतो.

प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे गेला आहे. आजकाल मुली कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड बदलतात. घटस्फोटाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा स्थितीत साखरपुडा मोडला असेल तर लोक ती का विसरू शकत नाहीत? असे म्हणत तिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एक काळ असा होता की, अक्षय आणि रवीनाच्या नात्याची मोठी चर्चा होती. या दोघांनी पहिल्यांदा 'मोहरा' चित्रपटात काम केले होते. दोघांनी गुपचूप साखरपुडा उऱकल्याचेही म्हटले जात होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच ते वेगळे झाल्याचे समोर आले.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन 20 वर्षांनंतर 'वेलकम 3'मध्ये एकत्र काम करणार आहेत. तथापि, हा एक मल्टी स्टारर चित्रपट आहे ज्यामध्ये दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, संजय दत्त, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, राजपाल यादव यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. पण मजनू भाई म्हणजेच अनिल कपूर आणि उदय शेट्टी म्हणजेच नाना पाटेकर दिसणार नाहीत.

आता वेलकम टू द जंगल या चित्रपटात कलाकार एकत्र दिसत असले तरी अनिल कपूर आणि नाना पाटेकर हे दोघे नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सोशल मिडियावर दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ritika Sajdeh: रितिका सजदेहची लक्झरी चॉईस! मुंबईत खरेदी केलं नवीन आलिशान घर; किंमत तब्बल 'इतके' कोटी

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT