Kuch Kuch Hota Hai: 'कुछ कुछ होता है' होणार री-रिलिज; निर्मात्यांची मोठी घोषणा

Kuch Kuch Hota Hai: 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचे तिकीट दर फक्त 25 रुपये ठेवण्यात आले आहेत.
Kajol and Shah Rukh Khan in Kuch Kuch Hota Hai movie
Kajol and Shah Rukh Khan in Kuch Kuch Hota Hai movieTwitter/@SyrnMedia
Published on
Updated on

Kuch Kuch Hota Hai: काही चित्रपट कितीही जूने झाले तरीही त्यांची जादू कायम टिकून असते. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे कुछ कुछ होता है हा आहे. २५ वर्षापूर्वी हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. कुछ कुछ होता है या चित्रपटाचे अनेक चाहते आहेत.

यावर्षी या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे धर्मा प्रोडक्शनने या चित्रपटाला री-रिलिज करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या २५ मिनिटांच्या आत ही सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

धर्मा प्रॉडक्शनने 'कुछ कुछ होता है' पुन्हा रिलीज आणि स्पेशल स्क्रीनिंगची घोषणा केली. निर्मात्यांनी म्हटल्यानुसार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये एन्जॉय करण्याची संधी मिळणार आहे. 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचे तिकीट दर फक्त 25 रुपये ठेवण्यात आले आहेत.

कुठे पाहता येणार चित्रपट?

PVR आयकॉन वर्सोवा, मुंबई येथे संध्याकाळी 7:00 आणि 7:15 वाजता काही कुछ होता है हा शो दाखवला जाणार आहे. दरम्यान,1998 मध्ये रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाने त्या वर्षी खळबळ उडवून दिली होती.

Kajol and Shah Rukh Khan in Kuch Kuch Hota Hai movie
Dharmendra: ८७ वर्षांच्या धर्मेंद्रचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या चित्रपटाने देशात 46.88 कोटी रुपये जमा केले, तर जगभरात त्याची कमाई 91.09 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्यावेळी लोकांना तिकीटही मिळत नव्हते. चित्रपट( MOVIE) गृहांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता हा चित्रपट री-रिलीज होणार असल्याने चाहते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com