Akshay Kumar is likely to make biopic on Story of Neeraj Chopra Dainik Gomantak
मनोरंजन

Neeraj Chopra ने 'गोल्ड' जिंकल्यावर 'अक्षय कुमार'ची का होतेय चर्चा ?

Olympic 2020: नीरज कुमारने भाला फेकमध्ये सुवर्ण पदक (Gold MedaL) मिळवले तसेच बजरंग पुनीयाने कांस्य पदक मिळवले आणि देशभराच जल्लोष साजरा होऊ लागला.

दैनिक गोमन्तक

ऑलिम्पिकच्या (Olympic 2020) पार्श्वभुमीवर भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरला. कारण आज ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला सुपर्ण पदक (Gold Medal) मिळाले आहे. भाला फेक या प्रकारात प्रसिद्ध खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) देशाला ऑलिम्पिक 2020 चे पहीले सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. या ऐतिहासिक यशानंतर सर्वच स्थरांतून नीरजते कौतूक होते आहे. मात्र याचवेळी सोशल मिडीयावर चर्चा होतेय बॉलीवुडच्या खिलाडीची अर्थात अक्षय (Akshay Kumar) कुमारची.

अक्षय कुमार हा आपल्या ‘खिलाडी’ इमेजमुळेच प्रसिद्ध आहे. आज नीरज कुमारने भाला फेकमध्ये सुवर्ण पदक मिळवले तसेच बजरंग पुनीयाने कांस्य पदक मिळवले आणि देशभराच जल्लोष साजरा होऊ लागला. याचवेळी अक्षय कुमार येणाऱ्या काळात या खेळांडूंच्या जीवनावर बायोपीक बनवरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, अनेक चाहते आणि काही प्रसिद्ध अकाउंटवरुन देखील या विषयावर वेगवेळ्या प्रतिक्रीया आल्या आहेत. काहींनी तर अक्षयचा एक जुना फोटो शेअर करत, भाला फेक करत अक्षय चित्रपटाची तयारी करत असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता अक्षय कुमारने आज या दोन्हीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेक चाहत्यांनी नीरज आणि बजरंगच्या जीवनावरचा बायोपीक तयार करावा आणि त्यात अक्षयने या ‘रिअल हिरोज’;ची भुमिका साकारावी अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी यावर जोक करत, अक्षयने हा चित्रपट न केलेलाच बरा अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. अक्षयचे वय जास्त आहे वगैरे वगैरे प्रतिक्रीया सोशल मिडीयावर आल्या आहेत. आता अक्षय या विषयांवर चित्रपट बनवतो का हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT