'बिग बीं'च्या बंगल्या बाहेर सुरक्षा वाढवली; बाॅम्ब ठेवण्याची आली होती धमकी

बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बंगल्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) बॉम्बची (Bomb) माहिती मिळाल्यानंतर हे करण्यात आले आहे.
Amitabh Bachchan bungalow Bomb threat
Amitabh Bachchan bungalow Bomb threatDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बंगल्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) बॉम्बची (Bomb) माहिती मिळाल्यानंतर हे करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, शोध दरम्यान आतापर्यंत संशयास्पद काहीही सापडले नाही. (Security beefed up at Amitabh Bachchan bungalow police have received a bomb threat call)

पोलीस अधिकाऱ्याने माध्यमाला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री फोन आला, ज्यामध्ये कॉलरने सांगितले की, बॉम्ब छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, दादर रेल्वे स्थानक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यापाशी आणि जुहू येथे ठेवले आहेत.

Amitabh Bachchan bungalow Bomb threat
फिल्म सेटवरच कोसळली नुसरत भरुचा; डॉक्टरांनी दिला खास सल्ला

कामाबद्दल बोलायला गेलो तर, अमिताभ यांच्यासाठी काही अतिशय मनोरंजक प्रोजेक्ट्स आहेत. ज्यात 'अयान मुखर्जी' चे 'ब्रह्मास्त्र'. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असतील. यात डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्कीनेनी आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Amitabh Bachchan bungalow Bomb threat
सोनू सूद श्रीनगरच्या दुकानात दिसला शूज आणि चप्पल विकताना; पाहा Video

तसेच, बिग बींकडे नागराज मंजुळे यांचा 'झुंड', नाग अश्विनचा प्रभास आणि दीपिका पदुकोण यांचाही एक शीर्षकहीन चित्रपट आहे. अमिताभ बच्चन यांनी 'द इंटर्न' च्या हिंदी रिमेकमध्ये दिवंगत ऋषी कपूर यांच्या जागेवर काम देखील केले आहे.

या सगळ्या व्यतिरिक्त, बिग बी देखील त्यांच्या पहिल्या रुमी जाफरी स्टारर 'चेहरे' च्या थिएटर रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटात रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर आणि क्रिस्टल डिसूझा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com