Actor Akshay Kumar and Actress Nupur Sanon Twitter/@CricBollyBuzz
मनोरंजन

अक्षय कुमार- नुपुर च्या 'फिलहाल 2' सॉन्गला चाहत्यांची चांगलीच पसंती

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या चित्रपटांबद्दल नेहमी चर्चेत असतो.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या चित्रपटांबद्दल नेहमी चर्चेत असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. येत्या काळात तो बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, पण सध्या अक्षय कुमार सोशल मीडियावर (social media) आपल्या ताज्या म्युझिक व्हिडिओ ‘फिलहाल 2’ (Filhaal 2) साठी मुख्य बातमी बनवताना दिसत आहे. काही वेळापूर्वी त्याचे 'फिलहाल 2' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्याने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं आहे. या गाण्यातील अक्षय कुमार आणि नुपूर सॅनॉनची (Nupur Sanon) जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.(Akshay Kumar and Nupur Sanons song Filhall 2 crossed 4 lakhs as soon as it was released)

अक्षयकुमार आणि नूपुर सॅनॉन यांचे बी प्राकचे 'फिलहाल' गाणे वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाले होते. हे गाणे खूप फेमस झाले होते. प्रेक्षकांनी या गाण्यावर प्रेम दाखवले होते. ज्यानंतर आता 'फिलहाल 2' या गाण्याचे दुसरे भागही रिलीज झाले आहेत. ज्याने हे रिलीज होताच एक चर्चा तयार केली आहे. अक्षय आणि नुपूरचे हे गाणे यूट्यूबवर रिलीज झाले आहे. या गाण्यावर काही वेळातच 4 लाखाहून अधिक व्यूज आले आहेत. त्याच्या या गाण्याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

अक्षय कुमारने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांबरोबरच आता त्याच्या म्युझिक व्हिडिओंवरही इंटरनेटवर वर्चस्व आहे. अक्षयच्या कामाविषयी बोलताना तो लवकरच 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसेच बराच काळ अडकलेला त्यांचा 'बेलबॉटम' (Bell Bottom) चित्रपट 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT