Akshay Kumar  dainik gomantak
मनोरंजन

अक्षय कुमारला आगामी चित्रपटासाठी हिरोईन मिळेना

करण जोहरच्या चित्रपटात नुसरत भरुचाला संधी

दैनिक गोमन्तक

Akshay Kumar : खतरों के खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारला आगामी चित्रपटासाठी हिरोईन मिळेना अशी स्थिती निर्णाण झाली आहे. तर नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट काही खास कमाई करताना दिसत नाही. तर त्याने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून त्यात इमरान हाश्मी दिसणार आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या या चित्रपटात बॉलिवूडमध्ये ए-लिस्ट मध्ये असणाऱ्या कोणत्याही अभिनेत्रीने रस दाखवलेला नाही. त्यामुळे अक्षय कुमारला आगामी चित्रपटासाठी हिरोईन मिळेना असेच चित्र पहायला मिळत आहे. मात्र याचा फायदा नुसरत भरुचाला होताना दिसत असून तिची वर्णी ही या चित्रपटात लागली आहे. तसेच नुसरतसह डायना पेंटी ही यात दिसेल. (Akshay Kumar and Emraan Hashmi announced their new film Selfiee)

या चित्रपटासंदर्भात अक्षय कुमारने सोशल मीडियावर (Social media) काही फोटो आणि व्हिडिओ टाकले आहेत. ज्यात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) मोटार सायकल वर बसून तर इमरान हाश्मी एकटा सेल्फी घेताना दिसत आहे. तसेच दुसरा फोटो हा गाडीतला असून त्यात अक्षय कुमार, इमरान हाश्मी, नुसरत, आणि डायना सेल्फी (Selfie) घेताना दिसत आहेत. तर आणखी एका फोटोत प्रत्येकाच्या हातात एक फाईल आहे. ज्यावर सेल्फी लिहिलेले आहे.

तसेच त्यांचा एक व्हिडिओ ही व्हायरल झाला असून त्यात ते सर्वजण स्क्रिप्ट वाचत आहेत. दरम्यान सेल्फी शीर्षक गीत वाजू लागले आणि प्रत्येकजण त्यावर जोरदार नाचू लागला. यावरून ही सेल्फी फक्त सेल्फी नसून तो अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट असल्याचे कळत आहेत. यामुळे अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर चाहत्यांचे भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

तसेच अक्षयने व्हिडिओच्या (video) कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आम्ही नुसरत भरुचा आणि डायना पेंटीसोबत पूर्ण तयारीत आहोत. या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. एका यूजरने व्हिडिओवर लिहिले की, मी या चित्रपटाची वाट पाहत आहे. तर या टीमचे अभिनंदन करताना दुसऱ्याने लिहिले की, ऑल द बेस्ट टीम सेल्फी. याशिवाय अनेक युजर्सनी हशा आणि हार्ट इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत

अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचा काही भाग मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही शूट केला जात आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपट (Movies) ड्रायव्हिंग लायसन्सचा रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT